अद्भुत शिवमंदिर जिथं सुर्य उगवताच किरणं पोहोचतात थेट गाभाऱ्यात

Shivmandir
Shivmandir

भोपाळ - जगात अनेक मंदिरांची रचना, त्यांचा इतिहास आणि तिथल्या घटना या गूढ असा असतात. भारतात काही मंदिरं अशी आहेत जी अर्धवट बांधलेली दिसतात. त्यामागे अनेक अख्यायिकाही सांगितल्या जातात. असंच एक मंदिर मध्य प्रदेशात आहे. या मंदिराबाबत सांगितलं जातं की, शापामुळे हे अपूर्ण राहिलं. तसंच या मंदिरात वास्तुशास्त्राचा अद्भुत असा नमुना बघायला मिळतो. सुर्योदय होताच त्याची पहिली किरणे थेट गाभाऱ्यात पोहोचतात. 

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात भैसदेही इथं सिद्धेश्वर नाथांचे मंदिर आहे. पूर्णा नदीच्या तिरावर असलेल्या या शिवमंदिराचे बांधकाम 11 व्या शतकात सुरू झालं होतं. भैसदेही इथं आधी रघुवंशी राजा गय याची राजधानी होती. तेव्हा या ठिकाणाला माहिष्मती नावाने ओळखलं जात होतं. पौराणिक कथांमध्ये गय राजा शिवभक्त होता असं म्हटलं जातं. त्यांनीच राजधानीत शिवमंदिर बांधण्यासाठी कारागिरांना बोलावलं होतं.

मंदिराच्या अपूर्ण राहिलेल्या बांधकामाबद्दल या भागात एक अख्यायिकाही सांगितली जाते. अख्यायिकेनुसार, शिव मंदिर उभारण्यासाठी राजाने तेव्हाचे प्रसिद्ध वास्तुशिल्पकार बंधू नागर आणि भोगर यांना बोलावलं होतं. राजाने त्यांना आदेश दिला होता की माहिष्मतीमध्ये सुंदर अशा शिव मंदिर निर्माण करा. नागर भोगर यांची मंदिर बांधकामाबाबत एक अट असायची. ती म्हणजे दोन्ही बंधू नग्नावस्थेत मंदिर बांधायचे आणि एवढंच नाही तर एका रात्रीत हे कार्य पूर्ण करत असतं. मात्र त्यांना एक शापही होता. नग्नावस्थेत मंदिर निर्मिती करत असताना त्यांना कोणी पाहिलं तर ते दगड होतील. सिद्धेश्वर मंदिराच्या बांधकामावेळी त्यांना कोणीतरी पाहिलं आणि मंदिर अपूर्णच राहिलं.

मंदिर अशा पद्धतीने उभारलं आहे की, सुर्याची पहिली किरणे थेट गाभाऱ्यापर्यंत पोहोचतात. सुर्यदेव इथं येऊन दर्शन घेतात अशीच भावना इथल्या भक्तांची आहे. शिवमंदिरात असलेल्या नंदीवर काही आदळलं तर त्यातून घंटा वाजल्यासारखा आवाज येतो. 

(अख्यायिका किंवा चमत्काराच्या गोष्टी या संबंधित भागातील लोकांकडून सांगण्यात येतात. यातून कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. सकाळ माध्यम समूह त्याच्याशी सहमत असेलच असं नाही.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com