रामायणातील 'राम सेतू'बद्दल 'या' 6 गोष्टी माहिती आहेत?; जाणून घ्या 7 हजार वर्षांपूर्वीची इतिहासाची रंजक कहाणी

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : 'राम सेतू'ला सामान्यत: अ‍ॅडम ब्रिज म्हणून देखील ओळखले जाते. हा एक वादग्रस्त पूल आहे आणि तो नैसर्गिक आहे की मानवनिर्मित?, यावर कित्येक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. तथापि, एका अमेरिकन सायन्स चॅनलच्या मतानुसार, हा पूल मानवनिर्मित असून काही शास्त्रज्ञांच्या मते, चुनखडीच्या गोळ्याने बांधलेला हा पूल नैसर्गिक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. तसेच, राम सेतूचा उल्लेख रामायणातही आढळतो.

रामायणानुसार, हा पूल भगवान श्रीराम आणि त्यांच्या वानर सेनेने बांधल्याचे इतिहासात दाखले आढळतात. जेव्हा लंकेचा राजा रावणाने माता सीतचे हरण करुन तिला पळवून नेले होते, त्यामुळे या पुलाला स्वतःचे असे धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. तामिळनाडूत देखील असाच एक पूल आहे, जो अजूनही हवाई दृश्य प्रदान करतो. तसेच हा पूल येथील पंबन बेटांसह श्रीलंकेच्या मन्नार बेटाला जोडला जातो. तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला राम सेतू पुलाशी संबंधित काही आश्चर्यकारक घटकांबद्दल सांगत आहोत, जे तुम्हाला नक्कीच आवडेल..

वॉकेबल ब्रिज

असे म्हणतात की, रामाचा पूल समुद्र सपाटीपासून उंचावर होता. काही ऐतिहासिक नोंदीसुद्धा असे सूचित करतात, की 15 व्या शतकापर्यंत हा पूल सहज चालताना पार केला जात होता. हा पूल जमिनीपासून सुमारे 3 ते 30 फूट खोलवर असल्याचे काही दाखले देखील उपलब्ध आहेत.

आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही न उलगडलेले 'सेतू'चे रहस्य

हा पूल अनेक लोकांना आश्चर्यचकित करीत असतो. परंतु, त्याच्या बांधकामाशी संबंधित अनेक शास्त्रज्ञांना अद्यापही  उलगडा करता आली नाही अथवा त्याचे निराकरण देखील होऊ शकले नाही. या पुलाच्या बांधकामात दगडांना जोडण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तंत्राबद्दल कोणालाही माहिती नाही. जगभरातील शास्त्रज्ञांनी यावर व्यापक संशोधन केले, परंतु तरीही त्यांना कोणतेही नेमके कारण सांगता आले नाही.

या पुलाला एक नाही, बरीच नावे..

तामिळनाडूतील रामेश्वरममधील राम सेतूचे नाव तुम्हाला माहित असलेच, परंतु तुम्हाला हे माहित आहे का?, या पुलाला इतरही अनेक नावे आहेत. याला अ‍ॅडम ब्रिज, नल सेतू आणि सेतू बंधा असेही म्हणतात. हा पूल राम आणि त्यांच्या सैन्याने बांधला असल्याने त्याला राम सेतू असेही म्हंटले जाते. त्याच बरोबर त्याला नल सेतू असेही म्हणतात. कारण, नलानेच रामायणानुसार पुलाची रचना केली होती. अ‍ॅडम ब्रिज हे नाव काही प्राचीन इस्लामिक ग्रंथांची देन आहे.

या पुलाजवळून कोणतेही जहाज जावू शकत नाही!

सन 1480 मध्ये समुद्रात मोठे चक्रीवादळ झाल्याने हा पूल पाण्याखाली गेला होता. तथापि, राम सेतू आजही पाण्याखालीच आहे, परंतु अद्याप जहाजे येथे जाऊ शकत नाहीत. खरंच, काही ठिकाणी पाणी पातळीच्या उथळ आहे. तसेच हा पूल पूर्णपणे पाण्यात बुडलेला नाही. त्यामुळे श्रीलंकेला जाण्यासाठी भारतातील जहाजांना दुसरा मार्ग अवलंब करावा लागतो.

रहस्यमय आणि आश्चर्यकारक

हा पूल 7000 वर्ष जुना आहे, असे समुद्रशास्त्राच्या अभ्यासातून दिसून आले आहे. याचा अर्थ असा की, हा पूल चिनची भिंत आणि इजिप्शियन पिरॅमिड इत्यादींपेक्षाही जुना आहे. वास्तविक, ही रचना 3 ते 4 हजार वर्षे जुनी आहे, तर राम सेतू किमान सात हजार वर्षे जुना असल्याचे काही इतिहासाचे दाखले सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com