esakal | मार्चमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय? मग 'हे' डेस्टीनेशन्स आहेत हटके

बोलून बातमी शोधा

tourist place which is better to explore in march nagpur news}

आपल्या देशात असे अनेक पर्यटन स्थळ आहेत, ज्या ठिकाणी आपण मार्च महिन्यात फिरायला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला असे काही स्थळ सांगणार आहोत, जिथे तुम्ही कुटुंब, मित्र-मैत्रिणी किंवा तुमच्या जोडीदारासोबत देखील फिरायला जाऊ शकता. मग चला तर जाणून घेऊया या स्थळांबद्दल

मार्चमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय? मग 'हे' डेस्टीनेशन्स आहेत हटके
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वाधिक थंडी असल्याने अनेकजण फिरायला जाण्याचं टाळतात. मार्च महिना येताच सर्वजण फिरण्याचे नियोजन करत असतात. मात्र, या महिन्यात काही प्रमाणात उन्हाच्या झळा जाणवू लागतात. त्यामुळे फिरायला जाताना कुठे जायचं, कुठले स्थळ निवडायचे याचे नियोजन करणे फार कठीण असते. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल, तर आज तुमची ही समस्या दूर होणार आहे.

आपल्या देशात असे अनेक पर्यटन स्थळ आहेत, ज्या ठिकाणी आपण मार्च महिन्यात फिरायला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला असे काही स्थळ सांगणार आहोत, जिथे तुम्ही कुटुंब, मित्र-मैत्रिणी किंवा तुमच्या जोडीदारासोबत देखील फिरायला जाऊ शकता. मग चला तर जाणून घेऊया या स्थळांबद्दल -

हेही वाचा - कोरोना काळातही बेजबाबदारीचा कळस, आरोग्य केंद्रात डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांचीच दांडी

कोडाईकनाल -
मार्च महिन्यात फिरायला जाताना तामिळनाडूमध्ये एकही स्थळ नाही, असे अनेकांना वाटते. तुम्हीही असाच विचार करता असाल तर ते चुकीचे आहे. तुम्ही तामिळनाडूला फिरायला जायचा विचार करत असाल कोडाइकनाल हा चांगला पर्याय आहे. तलाव, झील आणि पहाडी या ठिकाणाचे आकर्षण आहे. इथं तुम्ही फिरायला गेल्यास ट्रेकींग देखील करू शकता. सिल्वर कैसकेड फॉल्स और ब्रायंट पार्क अशा ठिकाणी देखील तुम्ही फिरायला जाऊ शकता. तसेच येथील स्थानिक जेवण देखील अतिशय रुचकर असतं. त्यामुळे तुम्ही त्याचा देखील आनंद घेऊ शकता 

खजुराहो -
मध्य प्रदेशमधील खजुराहो हे असे ठिकाण आहे ज्याठिकाणी प्रत्येकजण जात असतो. ही जागा अनेकांना आकर्षित करत असते. मध्ययुगीन काळातील वास्तूकला याठिकाणी पाहायला मिळते. याठिकाणी शंभर हिंदू आणि जैन मंदिरांचा एक समूह असल्याचेही सांगितले जाते. तसेच भारतातील प्रमुख वारसा स्थळांमध्ये देखील या ठिकाणाचा समावेश आहे. या ठिकाणाला भेट दिल्यानंतर पन्ना नॅशनल पार्क, लक्ष्मण मंदिर आदी ठिकाणांनाही तुम्ही भेट देऊ शकता. 

हेही वाचा - महसूल वाढविण्यासाठी सरकारचे मद्य विक्रीला प्रोत्साहन!; दोन दुकानातील अंतराची अट केली...

शिलांग -
उत्तर भारतात एकापेक्षा एक अनेक स्थळ आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही फिरू शकता. मात्र, यापैकी सर्वात सुंदर स्थळ म्हणजे शिलांग. मार्च महिन्यामध्ये देखील याठिकाणी मान्सून असतो. त्यामुळे पर्यटकांना या स्थळाची जास्तच ओढ असते. तसेच भारतीयांसोबत विदेशी पर्यटक देखील याठिकाणी फिरायला येत असतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जात असाल तर नक्की शिलांगला जा. त्याठिकाणची थंडी, मनमोहक दृश्य या सर्व गोष्टींमुळे तुमची ट्रीप अविस्मरणीय होईल.