जीवाची मुंबई करण्याचा प्लान आहे? 'या' किल्ल्यांना अवश्य भेट द्या अन् घ्या ट्रीपचा आनंद

visit to old fort in mumbai tourism
visit to old fort in mumbai tourism
Updated on

नागपूर : स्पप्न नगरी, माया नगरी अशा एक ना अनेक विशेषणांनी ओळखली जाते ती मुंबई. अनेकजण जीवाची मुंबई करण्यासाठी मुंबईला येतात. प्रसिद्ध बॉलिवूडशिवाय ऐतिहासिक स्थळ, धार्मिक स्थळांसाठीही मुंबई प्रसिद्ध आहे. यामध्ये लालबागचा राजा, सिद्धीविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदीर, मुंबा देवी मंदीर, हाजी अली दरगाह आदी धार्मिक स्थळ लोकप्रिय आहेत. तसेच जुहू चौपाटी, बँड स्टँड, गेटवे ऑफ इंडिया, नरीमन पॉईंट इत्यादी प्रेक्षणीय स्थळ आहेत. कोरोना महामारीपूर्वी देश-विदेशातील अनेक पर्यटक मायानगरीला भेट देत होते. आता देखील अनेक पर्यटक फिरण्यासाठी येतात. तुम्हीही कधी जीवाची मुंबई करण्याचा विचार करत असाल तर येथील किल्ल्यांना अवश्य भेट द्या.

सेवरी किल्ला -
हा किल्ला १६८० मध्ये प्रहरी रुपात बांधण्यात आला होता. पोर्तुगीज मुंबईत राहत होते त्यावेळी हा किल्ला तयार करण्यात आला होता. या किल्ल्यात घुसण्यासाठी संकरा रस्ता आहे. त्याठिकाणाहून येथील बंदारांचे दर्शन होते.

ब्रांदा किल्ला -
पोर्तुगीजांनी १६४० मध्ये या किल्ल्याचे बांधकाम केले होते. आज हा किल्ला खंडर बनला आहे. मात्र, अजूनही अनेक पर्यटक याठिकाणी फिरायला येतात. तुम्ही कधी मुंबईला गेलात तर बांद्रा किल्ल्याला जरूर भेट द्या.

वरळी किल्ला -
१६७५ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला असून येथून माहिमच्या खाडीचे दर्शन होते. त्यावेळी वरळी हे मच्छीमारांचे या गाव होते. या किल्ल्यामध्ये एक मंदीर देखील आहे. 

बॉम्बे किल्ला -
हा सर्वाधिक जुन्या किल्ल्यांमधून एक आहे. पोर्तुगीजांनी मैनर हाउस तयार केले होते त्यावेळी हा किल्ला बांधण्यात आला होता. ही जमीन १५५४ ते १५७० च्या काळात पोर्तुगीजांनी राजा ओर्टा यांच्याकडून भाड्याने घेतली होती. तुम्ही कधी मुंबईला गेले तर नक्की या किल्ल्यांना भेट द्या.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com