Bag Packing Tips
Bag Packing Tips esakal

Bag Packing Tips : उन्हाळ्याच्या सुट्टीत व्हेकेशन; बॅग भरायला या टीप्स करतील मदत!

ही काळजी घेतलीत तर सुट्टीचा आनंद द्विगुनित होईल

 Bag Packing Tips : उन्हाळ्याचा सिझन म्हणजे खाणं आणि फिरणं होय. मुलांनाही सुट्ट्या असतात. त्यामुळे पालकही सुट्टीचं नियोजन करतात. तुम्हीही यंदाच्या उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल. तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

फिरण्याचे ठिकाण नक्की झाल्यावर तयारी सुरू होते. ती बॅग भरण्याची. तुम्ही कुठे जाणार आहात त्यावर सोबत काय काय न्यायचं हे ठरवा. उन्हाळ्यात फिरताना कोण कोणत्या गोष्टी सोबत न्यायच्या याची लिस्टच पाहुयात.

Bag Packing Tips
Travel Tips : क्रूर प्राण्यांनी गजबलेलं बेट, जेवण सुद्धा हेलिकॉप्टरने पोहचवावं लागतं

कपडे

कपडे शक्यतो पॅकिंग करताना हलके, सुती किंवा होजिअरीचे टी-शर्ट असावेत. जीन्ससारखे प्रकार टाळावेत. प्रवासात हवेशीर आणि हलके कपडे असावेत. ट्रॅकपँट, टी-शर्ट, शॉर्ट पँट प्रवासात वापरास सोयीस्कर ठरतात. लहान मुलांच्या कपड्यांची वेगळी बॅग करावी, एक जोड कायम हाताशी हॅन्डबॅगमध्ये ठेवावा. किती कपडे घ्यावेत हा वैयक्तिक भाग आहे, पण दिवसाला एक जोड आणि रात्री वापरण्यासाठी एक असावाच.

बॅग

हार्ड लगेज टाइप म्हणजे कडक सुटकेससारखी बॅग न घेता डफलबॅग किंवा सॉफ्ट लगेजसारखी बॅग घ्यावी. जी कॅरी करणं अधिक सोप्प आणि सहज असेल.

पाऊच

बॅगमध्ये पेस्ट, साबण, ब्रश, नेलकटर अशा वस्तू असलेले टॉयलेट किट असावे. ते सहज हाताशी लागेल अशा हवाबंद डब्यात किंवा पाऊचमध्ये असावे.

Bag Packing Tips
Travel Tips : लहान मुलांसोबत प्रवास करताय? टेन्शन नॉट या खास टिप्स करा फॉलो

ट्रेकींगसाठी कपडे

ट्रेक किंवा जंगल ट्रेलसारख्या ॲक्टिव्हिटी असल्यास पूर्ण बाह्यांचे कपडे, चांगले बूट आणि आयोजकांनी सांगितलेली साधने यांचा समावेश आठवणीने करावा. 

लहान बॅग

या सर्व बॅगव्यतिरिक्त हाताशी लागणारे सामान एका लहान हँडबॅगमध्ये ठेवावे. त्यात नेहमीचे लागणारे पैसे, हातरुमाल, कायम लागणारी औषधे, फळे कापण्यास लागणारा लहान चाकू, पाचसहा पेपर प्लेट, नॅपकिन, लिक्विड सोप किंवा फेसवॉश, सॅनिटायझर, जुजबी प्रथमोपचाराचे साहित्य असावे. 

ट्रेकींगसाठी योग्य कपडे निवडा
ट्रेकींगसाठी योग्य कपडे निवडाesakal
Bag Packing Tips
Nature Tourism : निसर्गाची वाट, वरंधा घाट

सनस्क्रीम

उन्हाळ्यात रोजच सनस्क्रीम वापरावी असे सांगितले जाते. त्यामुळे प्रवासाला जाताना सनस्क्रीम सोबत घ्यावी.

सनग्लासेस

कडक उन्हापासून डोळ्यांचे रक्षण व्हावे, यासाठी योग्य सनग्लासेस वापरावेत. ऊन जास्त असेल तर कॅपही वापरावी. कॅपमुळे डोक्याची त्वचा सुरक्षित राहते. त्यामुळे तुमच्या पोषाखाला फॅन्सी लुकही येतो.

योग्य सनग्लास तुमचे डोळे सुरक्षित ठेवतील
योग्य सनग्लास तुमचे डोळे सुरक्षित ठेवतीलesakal
Bag Packing Tips
Nashik Tourism : पर्यटनाचे ‘फेव्हरिट डेस्टिनेशन’ नाशिक

स्विमसुट

तुम्ही समुद्र किनारी फिरण्यासाठी जाणार असाल तर तुम्हाला कुल लुक देईल असा स्विमसुटही सोबत घ्या.  यामुळे तुम्हाला समुद्रात खेळताना जास्त कंफरटेबल वाटेल.

खाण्याचे पदार्थ

तुम्ही जिथे कुठे फिरायला जाल तिथे सोबत नेता येईल अशी पाण्याची बाटली कॅरी करा. शरीर हायड्रेड ठेवतील असे ज्युस आणि फळांचे रस अधिक प्या.

पाणी आणि ज्युसवर अधिक भर द्या
पाणी आणि ज्युसवर अधिक भर द्याesakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com