शिवाजी विद्यापीठात होणार राजर्षी शाहू महाराजांचे वस्तूं संग्रहालय

Shivaji University : शाश्वत विकासाच्या गांधीवादाची मांडणी
Shivaji University : शाश्वत विकासाच्या गांधीवादाची मांडणीSakal News
Summary

स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे, यासाठी शिवाजी विद्यापीठात क्रांतीवन साकारले जाणार आहे.

कोल्हापूर : देशाला स्वतंत्र्य मिळून ७५ वर्षे होत आहेत. या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात क्रांतीवन उभारले जाणार आहे. यात शिल्प, स्वातंत्र्यसैनिकांचे नामफलक यासह अन्य गोष्टींचाही समावेश असणार आहे. विद्यापीठाच्या गेट क्रमांक ८ मधून आत गेल्यावर डाव्याबाजूला यासाठी जागा निश्चित केली असून लवकरच कामाला प्रारंभ होईल. स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे, यासाठी शिवाजी विद्यापीठात (Shivaji University) क्रांतीवन साकारले जाणार आहे. याचे स्वरुप जरी उद्यानासारखे असले तरी त्याची रचना ही वेगळ्या पद्धतीची आहे. इथे आलेल्या प्रत्येकाला स्वातंत्र्यलढ्याचे स्मरण येथील शिल्पांमधून होईल. आपला इतिहास समजावून घेता येईल. विद्यापीठात प्रवेश करतानाच हे क्रांतीवन असल्याने प्रत्येकाला ते आतून पाहाता येईल. हे क्रांतीवर सर्व नागरिकांसाठी खुले असणार आहे. या दृष्टीकोनातून याचा आराखडा तयार केला आहे.

असे असेल क्रांतीवन

- ग्रानाइटमधील स्वातंत्र्यसैनिकांचा नामफलक

- स्वतंत्र्यलढ्याची महती सांगणारे शिल्प

- ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था

- सौरउर्जेवर विद्यूत रोषणाई

- आकर्षक पुष्पसजावट

- विविध प्रकारची झाडे

शाहू चित्रप्रदर्शनी आणि वैज्ञानिक प्रयोग प्रदर्शन

विद्यापीठाच्या परिसरात राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारीत चित्रप्रदर्शनी तसेच त्यांच्या वस्तूंचे संग्रहालय होणार आहे. याच ठिकाणी एक ओपन एअर थिएटर उभारण्यात येईल. तेथे वैज्ञानिक प्रयोगांवर आधारीत कायमस्वरुपी प्रदर्शन साकारण्यात येणार आहे. विद्यापीठाचा परिसर मोठा असून तेथे विविध प्रकारची जैवविविधता आहे. यासर्व गोष्टींचा विचार करून विद्यापीठ परिसराचा पर्यटन आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे.

अध्यासनाच्या इमारती

विद्यापीठात मुलींचे आणखी एक वसतीगृह उभारण्यात येणार आहे. तसेच विविध अध्यासनांसाठी स्वतंत्र इमारती बनवण्याचाही प्रस्ताव आहे. यातील महावीर अध्यासन केंद्राची स्वतंत्र इमारत बांधली जाणार आहे.

देशाचा स्वातंत्र्यसंग्राम हा भावी पिढ्यांना प्रेरणादायी आहे. स्वतंत्र्यासाठी ज्यांनी जीवनाचा त्याग केला त्यांचे जीवनप्रवास सर्वांनाच मार्गदर्शक ठरणार आहे. हा विचार करून विद्यापीठात क्रांतीवन साकारणार आहेत. तरुण, तरुणींना उर्जा आणि प्रेरणा देणारे हे वन ठरेल असा या मागचा विचार आहे.

- डॉ.डी.टी.शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com