Flight Journey : ...म्हणून विमान प्रवासात फ्लाइट अटेंडंट सीट बदलण्यास देतात नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flight

Flight Journey : ...म्हणून विमान प्रवासात फ्लाइट अटेंडंट सीट बदलण्यास देतात नकार

Seat Change While Flight Traveling : आपल्यापैकी अनेकांना विमान प्रवासाचा आनंद घेतला असेल. मात्र, अनेकदा आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे सीट मिळत नाही. त्यामुळे हिरमोड होतो. त्यामुळे अनेकजण एअर होस्टेसकडे सीट बदलून देण्याची मागणी करतात. परंतु, याला नकार दिला जातो. हा नकार देण्यामागे अनेक कारणं आहेत. त्याबाबतच आज आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहोत.

हेही वाचा: Travel : स्वस्तातली परदेशवारी करायची आहे? पहा हे बेस्ट ऑप्शन

जेवण सर्व्ह करताना समस्या

जेवणाच्या प्री-बुकिंगसाठी आसन क्रमांक देखील दिले जातात, परंतु तुम्ही प्रवासादरम्यान जागा बदलल्यास तुमचे जेवणदेखील बदलले जाऊ शकते. कधी-कधी केबिन क्रू सुद्धा सीट बदलून जेवण सर्व्ह केल्यानंतर जेवण देण्याची हमी देत ​​नाही. याशिवाय तुम्ही प्रवासापूर्वी चांगल्या सीटसाठी अधिकचे पैसे दिले असल्यास ते वाया जाऊ शकतात.

हेही वाचा: Travel : फक्त पाच अमावस्येला या मंदिरात गेल्याने तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊ शकतात

बिघडू शकतो बॅलन्स

विमान टेकऑफ करण्यापूर्वी सीट बदलू नये, कारण वजन आणि बॅलेन्सची गणना तुम्ही निवडलेल्या सीटवरून केली जाते. प्रवासात एका व्यक्तीने जागा बदलल्यास फारसा फरक पडत नाही, परंतु मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जागा बदलल्यास विमान ट्रिममधून नियंत्रणाबाहेर जाईल आणि त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शकते.

अपघातानंतर मृतदेह ओळखण्यात येतात अडचणी

प्रवासादरम्यान, अनावधानाने विमानाचा कोणत्याही प्रकारे अपघात झाल्यास मृतदेहाची ओळख फटवणे अवघड होते. सीट बदलल्याने ही समस्या निर्माण होऊ शकते. तसेच, काही वेळा अनेक घटनांमध्ये पोलीस विमानातील काही लोकांची त्यांच्या माहितीसाठी चौकशी करतात, जागा बदलल्याने त्यांना योग्य माहिती मिळणे कठीण होते.

हेही वाचा: Tourism : प्रवास करताना कोणत्या चूका टाळाव्या?

वरील सर्व कारणांमुळे प्रवासादरम्यान फ्लाइट अटेंडंट प्रवाशांना सीट अदलाबदली करण्यास स्पष्टपणे नकार देतात. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंगही अनुभवण्यास मिळतात. मात्र, वरील सर्व बाबींचा विचार केल्यास त्यांचा नकार देणं योग्य असल्याचे आपल्याला कळून येईल.