Satara : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! धबधबे पाहायला जाणाऱ्यांवर होणार कारवाई, 'त्या' दुर्घटनेनंतर वनविभाग ॲक्टिव्ह

कास, ठोसेघरसह इतर परिसरात गेल्‍या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.
Forest department Ekiv Vajrai Thoseghar Waterfalls
Forest department Ekiv Vajrai Thoseghar Waterfallsesakal
Summary

वनक्षेत्रासह धबधबे (Ekiv Waterfall) आणि इतर ठिकाणी धांगडधिंगा, तसेच हुल्‍लडबाजी करणाऱ्यांवर वनकायद्यानुसार (Forest Act) गुन्‍हा नोंदविण्‍याची तयारी सुरू केली आहे.

सातारा : बहरात आलेल्‍या पावसाळी वातावरणाचा आनंद लुटण्‍यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून होणारी हुल्‍लडबाजी आणि त्‍यातून निर्माण होणारे धोके टाळण्‍यासाठी वनविभाग (Forest Department) ॲक्टिव्ह मोडवर आले आहे.

वनक्षेत्रासह धबधबे (Ekiv Waterfall) आणि इतर ठिकाणी धांगडधिंगा, तसेच हुल्‍लडबाजी करणाऱ्यांवर वनकायद्यानुसार (Forest Act) गुन्‍हा नोंदविण्‍याची तयारी सुरू केली आहे. वनविभाग, तसेच पोलिस यंत्रणा याबाबतचा संयुक्‍त आराखडा करणार असून, त्‍यासाठीचा पत्रव्‍यवहार देखील सुरू झाला आहे.

कास, ठोसेघरसह इतर परिसरात गेल्‍या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे त्‍याठिकाणचे ठोसेघर, वजराई, भांबवली तसेच एकीव येथील धबधबे प्रवाहित झाले आहेत. हे धबधबे पाहण्‍यासाठी, तसेच परिसरातील निसर्गसौंदर्य अनुभवण्‍यासाठी दररोज हजारो पर्यटक याठिकाणी येत असतात.

Forest department Ekiv Vajrai Thoseghar Waterfalls
ED च्या भीतीनं सत्तेत गेलो नाही, यापूर्वी अनेकवेळा सत्तेत जाण्याबाबत शरद पवारांनी चर्चा केली; मुश्रीफांचा गौप्यस्फोट

या पर्यटकांत तरुणाईच जास्त प्रमाणात असते. या युवकांपैकी अनेक जण नशेच्‍या अमलाखाली असतात. ते युवक शांतता धोक्‍यात आणतात. यातून काही दुःखद घटना देखील घडतात. या घटना घडू नयेत, यासाठी वनविभागाने आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना राबविल्‍या आहेत.

Forest department Ekiv Vajrai Thoseghar Waterfalls
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? जयंतरावांनी 25 वर्षांचा दाखला देत पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका

धबधबा परिसरातील धोकादायक ठिकाणी बंदिस्‍त करणे, आवश्‍‍यक त्‍याठिकाणी कुंपण घालत सूचना फलक लावणे, बंदोबस्‍तासाठी वनकर्मचाऱ्यांसह स्‍थानिकांची नेमणूक करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. या उपाययोजना राबवूनही युवक स्‍वत:चा, तसेच इतरांच्‍या जिवास धोका निर्माण होईल, असे कृत्‍य करत असतात.

यामुळे अनेक दुर्दैवी घटना घडतात. एकीव येथील धबधबा परिसरातील दुर्दैवी घटनेनंतर वनविभाग ॲक्टिव्ह मोडवर आला आहे. त्‍यांनी यापुढील काळात हुल्‍लडबाजांना आवर घालण्‍याबरोबरच वनसंपदेचे होणारे नुकसान टाळण्‍यासाठी वनकायद्यांचा आधार घेण्‍याचे ठरवले आहे.

यानुसार हुल्‍लडबाजांवर फौजदारी संहिता, तसेच वनकायद्यांनुसार गुन्‍हा नोंदविण्‍याची कारवाई करण्‍याचे वनविभागाच्‍या विचाराधीन आहे. यासाठीचा पत्रव्‍यवहार वनविभागाने पोलिस यंत्रणेशी सुरू केला आहे.

Forest department Ekiv Vajrai Thoseghar Waterfalls
Udayanraje Bhosale : 'मी 35 वर्षे सक्रिय आहे, मला समाजकारण समजलं; पण अजून राजकारण लक्षात येत नाही'

आवरा स्‍वत:ला, सावरा जिवाला

पावसाळ्यात फुललेला निसर्ग सर्वांना खुणावत असतो. या निसर्गाचा आनंद लुटण्‍यासाठी पावसाळ्यात काससह परिसरातील अनेक ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. यामध्‍ये तरुणाईचा अधिक भरणा असतो. निसर्गाच्‍या सान्निध्‍यात केलेले फोटोसेशन, सेल्‍फी सोशल मीडियावर टाकत त्‍याला मिळणाऱ्या लाईक्‍स आणि येणाऱ्या कमेंटस हा तरुणाईचा जिव्‍हाळ्याचा विषय असतो.

जास्‍तीतजास्‍त लाईक्‍स आणि कमेंटस् मिळवण्‍याच्‍या प्रयत्नात इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्‍याच्‍या नादात आत्‍मभान हरवते. या हरवलेल्‍या आत्‍मभानामुळे दुर्दैवी घटना घडतात. हे टाळण्‍यासाठी तरुणाईने स्‍वत:ला आवरत जिवाला सावरणे महत्त्वाचे आहे.

Forest department Ekiv Vajrai Thoseghar Waterfalls
लोकसभेसाठी मास्टर प्लान; मंत्रीपदाचा राजीनामा देऊन 'हा' बडा नेता निवडणूक लढवणार? कन्येलाही मिळणार संधी!

सुज्ञ नागरिकांचे कर्तव्‍य..

धोक्‍याच्‍या ठिकाणी सुरक्षितता बाळगण्‍यासाठीच्‍या वनविभाग, पोलिस यंत्रणा सूचना करत असते. त्‍याकडे दुर्लक्ष करत अतिउत्‍साही तरुणाई स्‍वत:चा जीव धोक्‍यात घालते. वारंवार सूचना करूनही पर्यटक न जुमानता दांडगाई करत असल्‍याने अनेकदा वन, तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना नाइलाजास्तव गप्‍प बसणे भाग पडते. त्‍याठिकाणी असणारे कर्मचारी आपल्‍या सुरक्षिततेसाठी असून, त्‍यांनी दिलेल्‍या सूचनांचे पालन करणे सर्व सुज्ञ नागरिकांचे कर्तव्‍य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com