लोणावळ्याची 'मगनलाल चिक्की' आणि रेल्वेचं खास कनेक्शन...

लोणावळ्यात १० पैकी ७-८ दुकानांवर तरी मगनलाल चिक्कीचा बोर्ड पाहायला मिळतोचं...
लोणावळ्याची 'मगनलाल चिक्की' आणि रेल्वेचं खास कनेक्शन...

पुणे तसं पाहिलं तर बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, पण त्यातल्यात्यात विषय जेव्हा पर्यटनचा येतो तेव्हा लोणावळ्याच्या उल्लेख सगळ्यात आधी केला जातो. पुणे आणि मुंबईकरांसाठी तर लोणावळा म्हणजे हक्काचं विकेंड डेस्टिनेशन बनलंय. आणि हा लोणावळा फेमस आहे आपल्या मगनलाल चिक्कीसाठी.

म्हणजे तुम्ही जर लोणावळ्यात एन्ट्री मारली तर, १० पैकी ७-८ दुकानांवर तरी मगनलाल चिक्कीचा बोर्ड पाहायला मिळणारचं. तशी आज ठिकठिकाणी मगनलाल चिक्कीची दुकान पाहायला मिळतील. पण जणू एखाद्या रीतीप्रमाणं लोणावळ्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपल्या सोबत जाताना वेगवेगळ्या व्हरायटी आणि चवीसाठी फेमस असलेल्या मगनलाल चिक्कीचं एक तरी पाकीट आपल्या सोबत घेऊन जातोच जातो.

लोणावळ्याची 'मगनलाल चिक्की' आणि रेल्वेचं खास कनेक्शन...
राज ठाकरेंच्या धमकीनंतर अफझलखानच्या कबर परिसरात मोठा बंदोबस्त

अशा या फेमस मगनलाल चिक्कीला सुरुवात झाली ती स्वातंत्र्याआधी म्हणजे १८८८ साली. भेवारजी अग्रवाल यांनी आपला मुलगा मगनलाल यांच्या नावाने मिठाईचं एक दुकान सुरु केलं. त्यांच्या दुकानात गुड-दानी तयार करून विकली जायची. म्हणजे शेंगदाणे साफ करून ते बारीक करून त्यात गूळ घालायचा आणि बारीक कडक मिठाई बनवायची. सागवानाच्या झाडाच्या कोरड्या पानात ती मिठाई देऊन दुकानात विकली जायची.

भेवारजी यांचं हे दुकान मुंबई-पुणे रेल्वे प्रवासादरम्यान स्टेशनच्या मोक्याच्या ठिकाणी होत. त्यामुळं प्रवासा दरम्यान लोकांची दुकानावर चक्कर असायची. हळूहळू भेवारजी यांची ही गुड-दानी फेमस झाली.

लोणावळ्याची 'मगनलाल चिक्की' आणि रेल्वेचं खास कनेक्शन...
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पूर्वीचं बौद्ध विहार; डॉ. आगलावेंचा दावा
लोणावळ्याची 'मगनलाल चिक्की' आणि रेल्वेचं खास कनेक्शन...
पाकिस्तान सरकार म्हणतंय, दुसरा पर्यायच नाही; इम्रान खानला अटक होणार

भेवारजी यांच्यासोबत मगनलाल यांनी आपल्या वडिलांचा हा कारभार हाती घेतला. मगनलाल गुड-दानी मोठी फेमस व्हायला लागली. लोक मुद्दामहून स्टॉपवर उतरून गुड-दानी खरेदी करायची. बऱ्याचदा दुकानावर इतकी गर्दी व्हायची कि, प्रवाशांची रेल्वे सुद्धा चुकायची.

रेल्वे विभागानं ही गोष्ट हेरली, गुड-दानी आरोग्याला सुद्धा फायदेशीर आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी मगनलाल यांना रेल्वेत आपल्या गुड-दानीची पाकीट विकण्याची विनंती केली. सोबतच चवीप्रमाणे जिभेवर रेंगाळत राहील असं नाव देखील ठेवायला सांगितलं आणि तेव्हा चर्चेनंतर गुड-दानीला 'चिक्की' असं नाव देण्यात आलं. पुढे जाऊन चिक्की लोणावळ्याची ओळख बनली.

लोणावळ्याची 'मगनलाल चिक्की' आणि रेल्वेचं खास कनेक्शन...
ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता फास्टट्रॅक कोर्टात; 30 मे होणार सुनावणी

मगनलाल यांच्या मृत्यनंतर या व्यवसायात अंबालाल आणि मोहनलाल ही त्यांची दोन मूलं सुद्धा जोडली गेली. 'मगनलाल चिक्की' ब्रँड बनवण्यात या दोघांनी कुठलीच कसर सोडली नाही. त्यावेळी काही सोशल मीडिया नव्हता किंवा जाहिरातीच कुठलं मोठं साधन, केवळ चिक्कीच्या चवीच्या जोरावर हा ब्रँड उभा राहिला. फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मगनलाल चिक्कीने ओळख तयार केली.

मगनलाल ग्रुपने पुढे जाऊन चिक्कीसोबतच सॉल्टी स्नॅक्स, जेली मिठाई, जॅम, फ्रूट सिरप अशी बरीच उत्पादन बाजारात आणली आणि या उत्पादनांना सुद्धा तितकीच मोठी प्रसिद्धी मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com