Hotel Booking Basic Tips | ट्रिपला जाण्यापूर्वी हॉटेल बूक करताय! 'या' टिप्स फॉलो करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hotel Booking Basic Tips

हॉटेल बुक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेण्याबरोबरच काही गोष्टी माहिती असणे आवश्यक

ट्रिपला जाण्यापूर्वी हॉटेल बूक करताय! 'या' टिप्स फॉलो करा

तुम्ही फिरायला जात असाल तर डेस्टिनेशनपासून शॉपिंगपर्यंत (Shopping) सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करता, पण अनेकदा असं होतं की, आपण हॉटेलच्या बाबतीत बेफिकीर होतो. आपल्याला वाटतं की आपण सकाळी जाऊन कोणतेही हॉटेल बुक (Hotel Booking) करू किंवा प्रवासादरम्यानच आपल्याला बजेटमध्ये (Budget) हॉटेल मिळेल. असे केल्याने आपण आपला वेळ वाचवतो, पण तरीही तुम्हाला चैन पडत नाही. हॉटेलमध्ये जाऊन फसवणूक झाल्यासारखे वाटते आणि आपण थोडे जास्त पैसे वाया घालवले आहेत असे आपल्याला वाटते. अशावेळी हॉटेल बुक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेण्याबरोबरच काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

हेही वाचा: मोबाईलवरून करा आता मेट्रोचे तिकीट बुक

सकाळी जास्त महाग असतात हॉटेल्स -

आपल्याला असे वाटते की शेवटच्या क्षणी बुकिंगमध्ये आपल्याला चांगली डील मिळेल परंतु तो आपला गैरसमज आहे. सकाळी हॉटेल्स खूप महाग असतात, त्यामुळे त्रास होऊ नये म्हणून अॅडव्हान्स बुकिंग करावं.

जुनी बेडशीट -

हॉटेलमध्ये बेडशीट कितीही स्वच्छ दिसत असली, तरी ती तुमच्यासमोर बदलून घ्या. कारण हॉटेलचे कर्मचारी पुढच्या ग्राहकांसाठी ते बदलत नाहीत.आपल्या सर्वांना माहित आहे की, कोरोना महामारीच्या धोक्यादरम्यान आपण स्वच्छता आणि सुरक्षिततेची अधिक काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा: मॅजिकल तारखेला मॅजिकल विश्‍वविक्रम! OMG बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली दखल

डॉयरेक्ट बुकिंगऐवजी अॅपने बुक करा -

हॉटेलच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन बुकिंग केलंत तर तुम्हाला हे हॉटेल खूप महागडं वाटू शकतं. तर अनेक हॉलिडे किंवा हॉटेल बुकिंग अॅप्स आपल्यासाठी हॉटेल बुकिंग स्वस्त करतात. कारण यात अनेक कूपन कोड आणि डील्स देखील मिळतात.

हॉटेलच्या कोप-यात असतात मोठ्या खोल्या -

हॉटेलच्या कोपऱ्याच्या बाजूच्या खूप मोठ्या खोल्या असतात, हे बहुतेकांना माहीत नसतं. त्यामुळे तुम्ही फॅमिली ट्रिपला असाल किंवा बीन बजेटमध्ये मोठी खोली हवी असेल तर कोप-याकडील बाजूची रूम निवडू शकता.

हेही वाचा: हॉटेल निमंत्रणमध्ये सी फूड फेस्टिव्हल

हॉटेल सिक्युरिटी आणि सेफ्टी -

असे म्हणतात की एकमेकांवर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे, परंतु जेव्हा आपल्या सुरक्षिततेचा विचार केला जातो तेव्हा आपण ही म्हण काही काळ बाजूला ठेवली पाहिजे आणि सर्व काही ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी स्वत:तपासले पाहिजे. खोली आणि हॉटेलच्या टॉयलेटमध्ये एकदा तपासावे की कुठेही कॅमेरा लावलेला नाही.

Web Title: Hotel Booking Basic Tips You Must Know

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Online BookingTips
go to top