२०२२ उजाडताच भारताच्या पासपोर्टबाबत आली पॉझिटिव्ह बातमी

जागतिक क्रमवारीत ९० वरून ८३ व्या स्थानावर उडी
Indian Passport Gets Stronger
Indian Passport Gets Strongeresakal
Summary

जागतिक क्रमवारीत २०२१ साली भारतीय पासपोर्टचे स्थान ९० व्या क्रमांकावर होते. ते आता ८३ व्या स्थानावर आले आहे. म्हणजेच सात आकड्यांनी वर आले आहे

कोरोना काळामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. मात्र भारतीय पासपोर्टधारकांसाठी (Indian Passport) एक चांगली बातमी आहे. जागतिक क्रमवारीत २०२१ साली भारतीय पासपोर्टचे स्थान ९० व्या क्रमांकावर होते. ते आता ८३ व्या स्थानावर आले आहे. म्हणजेच सात आकड्यांनी वर आले आहे. पासपोर्ट धारक व्हिसाची (Visa)आवश्यकता नसताना किती देशांना भेट देऊ शकतात, यावरून पासपोर्टची ताकद मोजली जाते. ज्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे ते आता व्हिसाच्या गरजेशिवाय जगभरातील (World) ६० देशांना भेट देऊ शकतात. २०२१ मध्ये अशा देशांची संख्या ही ५८ होती. (Indian Passport Gets Stronger)

Indian Passport Gets Stronger
पुढचं स्टेशन पनौती! भारतातील रेल्वे स्थानकांची हटके नावं

ही क्रमवारी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) च्या डेटाच्या आधारे हेनली पासपोर्ट इंडेक्सनुसार लावण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती पूर्वीच्या व्हिसाच्या (Visa) गरजेशिवाय इतर देशात पर्यटन (Travel) किंवा इतर कारणाेसाठी भेट देऊ शकणार्‍या देशांची सरासरी संख्या 107 आहे, असे निर्देशांक सांगतो. पॅरामीटरप्रमाणे यूएसए, सिंगापूर आणि जपानसह अनेक देशांचे पासपोर्ट धारक 180 देशांमध्ये प्रवेश करू शकतात. (Indian Passport Gets Stronger)

Indian Passport Gets Stronger
कमालच आहे! एक पण रस्ता नाही गावात, मग कसा करतात प्रवास?
japan singapore passport
japan singapore passport esakal

जपान, सिंगापूर अव्वल स्थानी (World's strongest passports)

निर्देशांकात जपान आणि सिंगापूरने अव्वल स्थान पटकावले आहे. दोन्ही देशांच्या पासपोर्टवर व्हिसाशिवाय तब्बल 192 ठिकाणांना (destination) भेट देता येते! यात सध्याचे COVID नियम आणि निर्बंध विचारात घेतलेले नाहीत. तर विषमतेमुळे अफगाणीस्तानचा पासपोर्ट सगळ्यात कमकुवत मानला जातो. (Indian Passport Gets Stronger)

Indian Passport Gets Stronger
ओमिक्रॉनचं संकट; प्रवासादरम्यान अशी घ्या काळजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com