International Mountain Day : लो बजेट ट्रिपसाठी भारतातील या प्रसिद्ध हिल स्टेशन्सना भेट द्या!

का साजरा केला जातो पर्वत दिन?
International Mountain Day
International Mountain DayEsakal
Updated on

भारताची गणना जगातील सर्वात सुंदर देशांमध्ये केली जाते. कारण आपल्या देशात बर्फाच्छादित पर्वतरांगा, तलाव, हिल स्टेशन, समुद्र किनारे आणि बऱ्याच ठिकाणी दिसणारी नैसर्गीक मनमोहक दृश्ये जगभर प्रसिद्ध आहेत. या सगळ्यात निसर्गाचा चमत्कार अनूभवण्यासाठी पर्यटकांचा कल हिल स्टेशनकडे असतो.

आपल्या पृथ्वीचा सुमारे 27 टक्के भाग केवळ पर्वतांनी व्यापलेला आहे. पण वर्षानुवर्षे माणसाने पर्वतांचे खूप नुकसान केले आहे. ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषणामुळे आज पर्वतांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत लोकांना पर्वतांची जाणीव व्हावी या उद्देशाने दरवर्षी माउंटन डे साजरा केला जातो.

International Mountain Day
Best Tips For Wildlife Travel : जंगल सफारी करताना वाघाला...

1992 मध्ये शाश्वत विकासाच्या चळवळीदरम्यान संयुक्त राष्ट्रांनी 'शाश्वत पर्वत विकास' साजरा करण्यात यावा यासाठी एक अहवाल बनवला होता. या आहवालात मानव जातीने पर्वतांचा ऱ्हास केलाय. त्यामूळे पर्वतांची सुरक्षा करण्याची गरज असल्याचे मुद्दे मांडण्यात आले होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने 2003 मध्ये 11 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा केला जातो.

International Mountain Day
Christmas Celebration : बर्फवृष्टीशिवाय ख्रिसमसला मजा नाही; या ठिकाणीच साजरा करायला हवा ख्रिसमस !

एखाद्या चांगल्या हिल स्टेशनला भेट द्यायची म्हणजे तूम्हाला जास्त खर्च येतो. पण, तूम्ही कमी बजेट ट्रिप शोधत असाल. तर, भारतातील हि काही खास हिल स्टेशन्स कमी खर्चीक आहेत. याच दिवसाच्या निमित्ताने भारतातील असे काही पर्वत पाहुयात जिथे कमीत कमी खर्चात तूम्ही फिरायला जाऊ शकता.

कासोल - हिमाचल

जमिनीपासून १६०० फूट उंचीवर वसलेले एक छोटेसे शहर  कासोल पर्यटकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हिमाचलमधील हे सुंदर ठिकाण पर्यटकांचे फेवरेट हिल स्टेशन आहे. नदीच्या काठावर वसलेले हे ठिकाण शांततेच्या ठिकाणांसाठी ओळखले जाते. कुल्लूच्या मध्यभागी असलेल्या या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग आणि माउंटन क्लाइंबिंगसारख्या स्पोर्ट्सचा आनंद लुटू शकता.

International Mountain Day
Hotel Rules For Unmarried Couples: कृपया इकडे लक्ष द्या! अनमॅरीड कपल्सना हॉटेलमधील हे नियम माहिती असणे गरजेचेच!

लॅन्सडाउन - उत्तराखंड

हे पर्यटनासाठीचे परफेक्ट ठिकाण म्हणून विकसित होत आहे. लॅन्सडाउन सुंदर आणि खिशाला परवडणारेही आहे. उत्तराखंड राज्यात वसलेले हे सुंदर ठिकाण समुद्रसपाटीपासून 1076 किलोमीटर उंचीवर असून येथे तूम्ही ट्रेकिंग आणि बोटींग करू शकता.

चैल हिल स्टेशन

हिमाचल प्रदेश नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हिमाचलचे चैल हिल स्टेशन हे पर्यटकांसाठी एक सुंदर ठिकाण तसेच स्वस्त पर्यटन स्थळ आहे. चैल हिल स्टेशन हे सर्वात उंच क्रिकेट मैदानासाठी देखील ओळखले जाते. या छोट्या हिल स्टेशनमध्ये फक्त 3 ते 5 हजार लोकच आरामात फिरू शकतात. 500 ते 1 हजार रुपयांमध्ये तुम्हाला हॉटेलमध्ये रूम सहज मिळू शकते. जर तुम्ही चैलला जात असाल तर तुम्ही वन्यजीव अभयारण्य, काली का टिब्बा, गुरुद्वारा साहिब, सिद्ध बाबा मंदिर, चैल क्रिकेट ग्राउंड आणि चैल पॅलेसला भेट देऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही लेक व्ह्यूइंग, बोटींग आणि ट्रेकिंग आणि पॅराग्लायडिंग चाही आनंद घेऊ शकता.

International Mountain Day
BEST Ho-Ho Bus : फक्त १५० रुपयांत फिरा अख्खी मुंबई

अल्मोडा-उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये तुम्हाला अनेक कमी बजेटची पर्यटन स्थळे सापडतील. हिल स्टेशनबद्दल बोलायचे झाले तर अल्मोडा हे बेस्ट ठिकाण आहे. अल्मोडा एक छोटा जिल्हा असून तोहिमालयाच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. अल्मोडामध्ये तुम्ही अगदी कमी पैशात छान सहलीला जाऊ शकता. येथे तुम्हाला जागेश्वर मंदिर, नंदा देवी मंदिर, कासार देवी मंदिर आणि स्वामी विवेकानंद मंदिर पाहायला मिळेल. अल्मोरा येथे झिरो पॉइंट, डीअर पार्क, बिनसार वन्यजीव अभयारण्य यासारखी काही ठिकाणे आहेत.

Picasa

भीमताल - उत्तराखंड

उत्तराखंडच्या आणखी एका स्वस्त हिल स्टेशनमध्ये भीमतालचे नाव येते. कमी बजेटमध्ये तुम्ही भीमतालच्या सर्वोत्तम ठिकाणांना सहज भेट देऊ शकता. येथील भीमताल तलाव, भीमेश्वर महादेव मंदिर, सय्यद बाबाची समाधी आणि भीमताल बेट हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. तुम्ही भीमतालमध्ये बोटिंग आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.

ऋषिकेश- उत्तराखंड

उत्तराखंडमधील ऋषिकेश धार्मिक आणि धाडसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या अनेक प्राचीन मंदिरांना भेट दिल्यानंतर तुम्ही ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग, क्लाइंबिंग आणि बंजी जंपिंगसारख्या साहसांचा आनंद घेऊ शकता. येथे प्रवास करणे खूप बजेट अनुकूल आहे. ऋषिकेशमध्ये केवळ दोन हजार रूपयात तूम्ही तीन दिवस राहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com