Jharkhand Tourism : झारखंडमध्ये फिरण्याचे अनेक ऑप्शन्स, एक्सप्लोर करा आणि ट्रिप अविस्मरणीय बनवा

रांची ही झारखंडची राजधानीच नाही तर इथले तिसरे मोठे शहर आहे
Jharkhand Tourism
Jharkhand Tourismesakal

Jharkhand Tourism : दिवाळीची सुट्टीत पाहुणे, बहिणी एकत्र जमतात तेव्हा कुठे ना कुठे जाण्याचा प्लॅन बनतो. पण सतत जवळची आणि तीच तीच लोकेशन नकोशी वाटतात. त्यामुळे यंदा काहीतरी वेगळं बघण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर झरखंडला जाण्याचा विचार तुम्ही करू शकता.

सहलीचे नियोजन करताना झारखंडला जाण्याचा विचार क्वचितच कोणी केला असेल. कारण बहुतेक लोकांना इथल्या पर्यटन स्थळांबद्दल माहिती नसते. तर इथे अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे पोहोचल्यावर तुम्हाला उत्तराखंड आणि हिमाचलच्या खोऱ्यात असल्याचा भास होतो.

झारखंड हे राज्य सन 2000 मध्ये बिहारपासून वेगळे झाले आणि वेगळे राज्य झाले. झारखंड भारताच्या उत्तर-पूर्व भागात स्थित आहे. पुढील सुट्ट्यांमध्ये तुम्ही झारखंडची ही ठिकाणे एक्सप्लोर करण्याचे प्लॅनिंग करू शकता.

Jharkhand Tourism
Shinde Fadnavis Delhi Tour: मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या! शिंदे-फडणवीस तातडीनं दिल्लीसाठी रवाना

रांची

रांची ही झारखंडची राजधानीच नाही तर इथले तिसरे मोठे शहर आहे. फक्त उदयपूरच नाही तर रांचीला देखील 'तलावांचे शहर' म्हटले जाते. मोठमोठ्या इमारतींसोबतच हे शहर हिरवाईनेही नटलेले आहे.

येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये गोंडा हिल, रॉक गार्डन, बिरसा बायोलॉजिकल पार्क, टागोर हिल, मॅक कालुस्कीगंज आणि आदिवासी संग्रहालय यांचा समावेश आहे. यासोबतच येथे धबधबेही आहेत. जिथे तुम्ही आरामात बसून क्वालिटी टाईम घालवू शकता.

पंच गड्या हा येथील सर्वात सुंदर धबधबा आहे. पाच प्रवाह एकत्र करून येऊन धबधबा कोसळतो तेव्हा ते एखाद्या भव्य चित्रपटातील सीनसारखे दिसते.

रांचीला देखील 'तलावांचे शहर' म्हटले जा
रांचीला देखील 'तलावांचे शहर' म्हटले जाesakal
Jharkhand Tourism
Foreign Tour करायचीय, मग या देशांमध्ये बिना व्हिसा फिरू शकतात भारतीय, मग कधी करताय प्लॅन?

हजारीबाग

झारखंडमधील भेट देण्याच्या ठिकाणांमध्ये हजारीबाग प्रथम येते. हजारीबाग म्हणजे हजारो बागा असलेले ठिकाण. त्यामुळे इथे येऊन तुम्ही हजारीबाग तलाव, कॅनरी हिल, वन्यजीव अभयारण्य, सूर्यकुंड, इचक अशा अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता.

हजारीबागमध्ये हिरवेगार पर्वत देखील दिसतात, जे आपल्याला उत्तराखंड आणि हिमाचलची आठवण करून देतात. अनेक डोंगरांसह एक तलाव असून त्याभोवती पिकनिक स्पॉट तयार करण्यात आले आहे. पर्यटक सुंदर दृश्यांसह सहल देखील करू शकतात.

हजारीबाग
हजारीबागesakal
Jharkhand Tourism
Foreign Tour करायची आहे? 1 लाखापेक्षा कमी खर्चात फिरू शकतात हे 8 देश

नेतरहाट

नेतरहाट हे झारखंडमधील सर्वात सुंदर ठिकाण आहे. जे निसर्गप्रेमींना खूप आवडेल. असं असलं तरी, वर्षातील बहुतेक महिने ते पर्यटकांनी गुंजत राहते. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 1128 मीटर उंचीवर आहे.

इथे आल्यावर धबधबेही पाहता येतात. धबधब्यातून सूर्यास्त आणि सूर्योदयाचे उत्कृष्ट दृश्य पाहता येते. येथे घाघरी धबधबा आणि कोएल नदी देखील पहा. नेतरहाटला जाण्याचा रस्ताही खूप सुंदर आहे.

Jharkhand Tourism
Egypt Tour : ‘बच्चन, शाहरूखच्या इंडियातून आलाय?’
नेतरहाट
नेतरहाटesakal

देवघर

झारखंडमधील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक, भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने आध्यात्मिक अनुभव देते. देवघर हे भारतातील तसेच जगभरातील अध्यात्म आणि गूढवादाचे प्रतीक आहे. "देवघर" चा शब्दशः अर्थ देवी-देवतांचे घर. मंदिराव्यतिरिक्त येथे इतरही सुंदर पर्यटनस्थळे आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात.

भगवान वैद्यनाथ धाम म्हणून ओळखले जाणारे हे हिंदू मंदिर पर्यटकांना आकर्षित करते. देवघर शहर हिंदू ग्रंथांमध्ये केतकीवन हरितकी वन म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात जगभरातून शिवांचे भक्त या शहरात येतात. मयूरकाशी नदीच्या काठावर वसलेले देवघर हे आध्यात्मिक आणि शांतीप्रेमी लोकांसाठी एक भक्तिमय ठिकाण आहे.

देवघर
देवघरesakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com