फिरायला जाण्याचा प्लॅन बनवताय? चला विदर्भाच्या काश्मिरात; 'ही' आहेत चिखलदऱ्यातील काही नयनरम्य स्थळं 

Know about travelling points in Chikhaldara Vidarbha Tourism
Know about travelling points in Chikhaldara Vidarbha Tourism

नागपूर: हिवाळ्याचे दिवस की वेध लागतात ते कुटुंबासोबत किंवा मित्रपरिवाराबरोबर पर्यटनाला जाण्याचे. सकाळची थंड हवा, अंगाला हळुवारपणे स्पर्श करून जाणारं कोवळं ऊन आणि आनंद अशा वातावरण पर्यटनाची मज्जाच वेगळी. त्यात मनाला मोहून टाकणाऱ्या निसर्गाची साथ असेल तर पर्वणीच. म्हणूनच अनेकजण हिवाळ्यात पर्यटनाला बाहेर पडतात. मोठमोठ्या डोंगरांनी व्यापलेल्या एखाद्या पर्यटन स्थळी लोकांना जायला नक्कीच आवडतं. असंच एक पर्यटन स्थळ म्हणजे चिखलदरा. 

विदर्भाचं काश्मीर म्हणून चिखलदऱ्याची ओळख आहे. हे ठिकाण सध्या पर्यटकांनी फुललं आहे. मात्र तुम्हाला चिखलदऱ्यातील काही महत्वाच्या स्थळांची माहिती आहे का? नसेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला चिखलदऱ्यातील काही महत्वाच्या स्थळांबद्दल सांगणार आहोत.       

चिखलदऱ्याचं पौराणिक महत्व 

चिखलदरा पासून अकरा किलोमीटर अंतरावर विराट राजाची राजधानी होती, तिला वैराट नगरी असे म्हणत आजही वैराट गाव या ठिकाणी वसलेले आहे. सुमारे पाच हजार वर्षापूर्वी पांडवांनी आपला अज्ञातवासाचा काही वेळ या सातपुडा पर्वत रांगेतील चिखलदाराच्या वनात पूर्ण केला अशी मान्यता आहे. त्यावेळी द्रौपदी सुद्धा वेश बदलून विराट राज्याच्या महाराणीची दासी म्हणून राहत असे. परंतु द्रोपदीवर विराट राजाचा मेहुणा किचक याची वाईट नजर पडली. तेव्हा द्रौपदीने हि गोष्ट भीमाला सांगितली आणि भिमाने किचक ठार केले आणि त्याचा मृतदेह वैराट पासून दूर एका नदीच्या दरीत फेकून दिला. आज हि ती दरी किचकदरी म्हणून ओळखल्या जाते. नंतर  शेजारी असलेल्या एका कुंडात भीमाने आपले हात धुतले तो कुंड भीम कुंड म्हणून ओळखला जातो. नंतर पुढे कीचक दरी वरून किचकदरा पुढे अपभ्रंश होऊन चिखलदरा हे नाव आल्याचे अभ्यासक सांगतात. 

चिखलदरा येथिल व्हीव पॉइंट

देवी पॉइंट : चिखलदरा येथिल दरी खाली उतरून गेल्यावर आपल्याला एका भुयारा सारखी जागा दिसते. या भुयाराच्या आत गेल्यावर एक देवीचे मंदिर दिसते. हे खरी देवीचे मंदीर आहे या ठिकाणालालच देवी पॉइंट असे म्हंटले जाते.

धबधबा : 

देवी पॉइंटपासून चंद्रभागा या नदीचा उगम होतो येथे देवीच्या मंदिरा समोर दगडी कुंडात देवीच्या कुंडातून पडणार्‍या पाण्यामुळे सुंदर धबधबा तयार झालेलेला आहे हा धबधबा सुद्धा पर्यटकांचे मोठे आकर्षण झाले आहे.

मोझरी पॉइंट आणि हरिकेत पॉइंट: 

देवी पॉइंट आणि धबधबा पासून जवळच मोझरी पॉइंट आहे त्याच्याच बाजूला लागून हरिकेत पॉइंट आहे.

वनोद्यान : 

येथे वन विभागाने वनोद्यान विकसित केले आहे या वनोद्यानात मुलांसाठी गार्डन रेल्वेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

किचकदरा (भीमकुंड ) : 

भीमाने येथील राजा कीचकचा वध करुन एका दरीत फेकून दिला होता. ती दरी म्हणजेच कीचकदरी होय. परंतु, कालांतराने कीचकदरीचे रुपांतर चिखलदरीत झाले व चिखलदरीचे चिखलदऱ्यात. चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. चिखलदरा येथे विविध पॉइंट पर्यटकांचे स्वागत करत असतात. दरीच्या पायथ्याशी काही पायऱ्या उतरुन गेले असता देवी पॉइंट आहे. डोंगराच्या एका भुयारात देवी वसलेली आहे. तेथून चंद्रभागा नदीचा उगम आहे. देवीच्या समोर एक कुंड आहे.

बहामनी किल्ला : 

चिखलदर्‍याच्या दक्षिणे दिशेला साधारण तीनते साडेतीन किलोमीटर गेल्यावर बहामनी किल्ला नजरेस पडतो. किल्ला खूप भव्य आहे. हा किल्ला संपूर्ण पहायचा असेल तर पूर्ण दिवस अपुरा पडतो. या किल्यामध्ये जुन्या इमारतींचे अवशेष व  तोफा आहेत. या किल्याचे वैशिष्ट्ये असे की, संरक्षणाच्या दुष्टिने सुरक्षित असा हा किल्ला आहे. किल्याची बांधणी दुहेरी तटबंदी पद्धतीने करण्यात आलेली आहे. ही तटबंधी आजही चांगल्या स्थितीत आहे.

पंचबोल पॉइंट किवा इको पॉइंट

चिखलदरा येथिल पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेला हा इको पॉइंट आहे याठिकाणी चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेली एक खोल दरी आहे. येथे मोठ्याने आवाज केल्यास पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो.

विराट देवी : 

चिखलदरा पासून साधारण ११ किलोमीटर विराट देवीचे मंदिर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com