भारताला निसर्ग सौंदर्याची देण आहे. भारतात अनेक दुर्मिळ प्राणी, वनस्पती आढळतात. भारतातील प्रसिद्ध जंगलांमध्ये जंगली प्राणी पाहण्यासाठी परदेशी पर्यटकही येतात. या राष्ट्रीय उद्यानांमध्ये जंगली वाघ, हत्ती, सिंह असे प्राणी विशिष्ट अंतरावरून पाहता येतात. केरळमधील काही खास उद्यानांमध्ये हत्तींसोबत दिवस व्यतीत करता येतो.
हे तर जमिनीवरील प्राणीसंग्रहालयाचे झाले. पण तुम्हाला माहितीये का की, भारतात समुद्राखालील राष्ट्रीय उद्यान किंवा सागरी राष्ट्रीय उद्यानही आहेत. आपण एखाद्या नॅशनल पार्कबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात हिरव्यागार जंगलाचं चित्र उभं राहतं, जिथे हरीण, रान म्हैस, हत्ती, अस्वल, जंगली कुत्रा, कोल्हा, हायना, सिंह, बिबट्या, चित्ता आणि अगदी पिवळ्या पट्टेरी वाघही फिरतात.