विदेशात नाही तर भारतातच आहे जगातील सर्वात मोठे बेट, वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विदेशात नाही तर भारतातच आहे जगातील सर्वात मोठे बेट, वाचा सविस्तर

गेली ५०० वर्षे माजुली ही आसामची सांस्कृतिक राजधानी असून आसामी संस्कृतीचे पाळणाघर आहे. माजुली हे बेट आसामी नव-वैष्णव संस्कृतीचे केंद्र मानले जाते.

विदेशात नाही तर भारतातच आहे जगातील सर्वात मोठे बेट, वाचा सविस्तर

अकोला : आपल्याला जगातल्या सर्वात जुन्या गोष्टींपैकी काही गोष्टी ऐकलेल्या किंवा माहित असतात, तेव्हा त्या क्षणी आपल्याला असं वाटू लागतं की त्या भारता बाहेरच असतील. जसे-जगातील सर्वात मोठे मंदिर-अंगकोर वा, कंबोडियामध्ये आहे. भारतात देखील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या विश्व विख्यात आहे आणि जगातील सर्वात मोठे सुध्दा. भारत जगातला सर्वात मोठा द्वीप ज्यात सूचीबद्ध आहे.
 
गिनीज वर्ल्ड रेकॉड्सच्या निकषांनुसार आसाम या राज्यातील ब्रम्हपुत्रा नदीवरील ‘माजुली’ बेट हे जगातील सर्वात मोठे नदीवरील बेट ठरले आहे. या आधी क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असणा-या ब्रझिलच्या ‘माराजी’ बेटास मागे टाकून माजुली बेटाने हा विक्रम नोंदवला आहे. पर्यावरणीय परिस्थिती बिघडल्यामुळे आणि नदी पात्राच्या -हासामुळे या बेटाचे क्षेत्रफळ २०वे शतक सुरू होण्यापूर्वी १,२५० चौकिमी होते, ते आता घटले आहे. आता ते फक्त ३५२ चौकिमी इतकेच उरले आहे. आजुबाजूच्या नद्यांचे पाणी वाढल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांतील पूर-परिस्थिती आणि बेटावरील नदीकाठाच्या भू-क्षरणामुळे बेटाच्या एक तृतीयांश भूभाग-क्षेत्रात घट झाली आहे. 

माजुली बेट

आसाममधील ब्रम्हपुत्रा नदीमध्ये हे बेट आहे. माजोलीचा अर्थ होतो की दोन समांतर नद्यांमधला प्रदेश. बेटाच्या उत्तरेस ब्रम्हपुत्रेची उपनदी सुबानसिरी आहे. दक्षिणेस ब्रम्हपुत्रा आणि खेरकानिया, सुली या नद्या आहेत. ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्या विशेषतः लोहित यांनी मार्ग बदल्याने हे बेट निर्माण झाले आहे. बेटावर १४४ खेड्यांमध्ये दीड लाखाच्या वर लोकसंख्या वास्तव्यास आहे. माजुली बेट हे दुर्मीळ पक्षी, पाणी व वनस्पतींचे ठिकाण आहे. स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या बेटास जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी युनोस्कोने नामनिर्देशित केले होते. 

सांस्कृतिक महत्त्व

माजुली बेटावर असलेल्या लोकसंख्येत मिशींग, देवरी, सोनोवाल कछारी या जमातींचा समावेश आहे. (याच बेटावरील सोनोवाल कछारी जमातीचे सर्बानंद सोनोवाल हे सध्या आसामचे मुख्यमंत्री आहेत.) मिशींग, आसामी, देवरी या भाषा येथे बोलल्या जातात.

सांस्कृतिक राजधानी

गेली ५०० वर्षे माजुली ही आसामची सांस्कृतिक राजधानी असून आसामी संस्कृतीचे पाळणाघर आहे. माजुली हे बेट आसामी नव-वैष्णव संस्कृतीचे केंद्र मानले जाते. थोर संत व समाजसुधारक ‘श्रीमंत शंकरदेव’ यांनी पंधराव्या शतकात या संस्कृतीची स्थापना केली होती. माजुलीमध्ये वैष्णव संस्कृतीच्या धार्मिक स्थळांना ‘सत्र' म्हटले जाते.

श्रद्धेच्या पलीकडे

जाणून घ्या बनावट नाेटांचे क्रमांक, तुमच्याकडे त्याच क्रमांकाची नाेट असल्यास जरुर नजीकच्या पाेलिस स्टेशनला कळवा

loading image
go to top