esakal | फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? घर सोडण्यापूर्वी या गोष्टी घ्या लक्षात
sakal

बोलून बातमी शोधा

Travel

फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग गोष्टी लक्षात घ्या

sakal_logo
By
टीम ईसकाळ

कोरोना महामारीने (Corona Pandemic) मागील काही दिवसांपासून सर्व जगाला वेठीस धरले आहे. कोरोनाच्या काळात अनेक क्षेत्रांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या सगळ्यात मोठी अडचण झाली ती पर्यटन क्षेत्राची. कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सर्वांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली त्यामुळे पर्यटनासाठी बाहेर जाण्याचा तर प्रश्नच उरला नाही. लॉकडाऊनमुळे (Lockdown) ट्राव्हल एजंसी, हॉटेल व्यवसाय, पर्यटकांवर अवलंबून असलेले इतर छोटे-मोठे उद्योग ठप्प झावे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू ओसरत असल्याने काही पर्यटनस्ठठे उघडण्यास सुरुवात झाली आहे. (plan to travel during corona pandemic know these travel safety tips)

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पर्यटनस्थळे उघडली जात आहेत. मागील जवळपास एक वर्षापासून कुठेही फिरायला न गेलेल्या मंडळीना ही पर्वणी ठरु शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक फिरायला बाहेर पडू शकतात. दरम्यान तुम्ही देखील कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायला हवी या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

भागातील कोरोना अपडेट्सची माहिती घ्या

प्रवासासाठी बाहेर जायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्या भागातील कोरोनाची स्थिती काय आहे हे माहिती करुन घ्या. आपण प्रवास करत असलेल्या शहरात कोरोनाचा हॉट स्पॉट किंवा कंटेन्ट झोन असेल तर आपण आपल्या प्रवासाचा प्लॅन काही दिवसांसाठी पुढे ढकलणे चांगले. तसेच तुम्ही कंटेन्ट झोनमध्ये राहत असल्यास कदाचीत तुम्हाला कोरोनाची लक्षणे दिसून येत नसण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही कंटेंट झोनमध्ये राहात असाल तर फिरायला जाण्याचा प्लॅन पुढे ढकला.

हेही वाचा: पाचगणी हिल स्टेशन : उन्हाळ्यासह पावसाळ्यातही भेट देण्याचे ठिकाण

आरोग्य सुविधा आहेत का?

आपण ज्या क्षेत्रात जात आहात त्या ठिकाणी आरोग्य सुविधांची स्थिती काय आहे याकडे देखील लक्ष द्या. आपण ज्या ठिकाणी जात आहात तेथे योग्य वैद्यकीय उपचार मिळतील की नाही हे माहिती असणे फार महत्वाचे आहे. जर आपण शहरांपासून दूर कुठेतरी फिरायला जात असाल तर त्या ठिकाणापासून चांगली रुग्णालये किती दूर आहेत ते शोधा. त्याचे लोकेशन माहिती करुन घ्या आणि एमर्जन्सीसाठी ते लक्षात ठेवा.

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास काय

तुम्ही फिरायला गेला असाल आणि त्या पर्यटनाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर देखील तुम्हाला कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पर्यटक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास त्या ठिकाणी कोणते नियम आहेत ते शोधा. तुम्हा महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये प्रवास करत असाल तर त्या राज्याचे नियम काय आहेत ते तपासा. त्या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज देखील तुम्हाला असणे चांगले ठरेल.

हॉटेल निवडताना काय काळजी घ्यावी?

कोरोनाच्या काळात फिरायला गेल्यानंतर योग्य हॉटेल निवडणे फार महत्वाचे आहे. त्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये स्वच्छतेबाबत काय उपाययोजना केल्या जात आहेत या विषयीची माहिती तपासून घ्या. बऱ्याच हॉटेलात कोणालाही रुम देण्याआगोदर ती सॅनिटाईझ करुन काही काळासाठी बंद ठेवण्यात येते. तुम्ही हॉटेल बुक करण्याआधी या विषयची माहिती त्या हॉटेलच्या वेबसाईटवर पाहू शकता.

हेही वाचा: अनलॉक होताच अनेकांना पर्यटनाची ओढ, प्रवासाच्या नियमांची चौकशी अन् बुकींगमध्ये अचानक वाढ

प्रवासा दरम्यान

देशात अनलॉक सुरू झाल्यानंतर काही शहरांसाठी हवाई आणि रेल्वे सेवा सुरू झाली आहे. त्यात हळूहळू वाढ केली जात आहे. आपण ज्या ठिकाणी जाण्याचा विचार करीत आहात तेथे जाण्यासाठी वाहतुकीच्या साधनांविषयी निश्चितपणे खात्री करा. आपल्याकडे कार असल्यास आपल्या स्वत: च्या गाडीने जाणे हा एक सुरक्षित पर्याय आहे. विमानाने किंवा ट्रेनने प्रवास करताना कोरोनासंबंधित सर्व सावधगिरी बाळगा.

(plan to travel during corona pandemic know these travel safety tips)

loading image