Summer Trip: उन्हाळ्यात फिरायला जातांना 'या' टिप्स करा फॉलो, ट्रीप ठरेल अविस्मरणीय

Best Summer Travel Trip:उन्हाळ्यात फिरायला जातांना काही गोष्टी सोबत ठेवल्यास ट्रीप अविस्मरणीय ठरू शकते.
Summer Trip
Summer TripSakal

Best Summer Travel Trip

उन्हाळा सुरू झाला आहे. आता देशातील जवळपास सर्वच भागात तापमान वाढू लागले आहे. लोकांना आता कडक उन्हाचा त्रास होऊ लागला आहे. उन्हाळा त्रासदायक असू शकतो, परंतु जेव्हा ट्रिपचा विचार येतो तेव्हा उन्हाचा विचार कोणी करत नाही आणि लोक उन्हाळ्याच्या सुट्टीत ट्रिप प्लॅन करतात. उन्हाळ्यात ट्रिपला जाण्याचा प्लॅन अनेक लोकांनी केला असेल. तुम्हीही उन्हाळ्यात ट्रिपला जात असाल तर कोणत्या गोष्टी बॅगमध्ये पॅक केल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

  • कॉटनचे कपडे

जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल तर बॅगमध्ये कॉटनचे कपडे नक्की सोबत ठेवावे. तसेच हलके फॅब्रिकचे कपडे देखील पॅक करावे. यामुळे तुम्हाला फिरताना कोणताही त्रास होणार नाही. तसेच उन्हाळ्यात जास्त टाइट कपडे घालणे टाळावे. कारण घामामुळे त्वचेला खाज सुटू शकते.

  • सनस्क्रीन

सुर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात आल्यास त्वचा टॅन होते. तुम्ही उन्हाळ्यात फिरायला जात असाल तर बॅगमध्ये सनस्क्रीन ठेवावे. यामुळे तुमचे उन्हाच्या अतिनिल किरणांमुळे रक्षण होईल.

Summer Trip
Summer Travel Tips: जंगल सफारीचा आनंद होईल द्विगुणित, बॅगेत 'या' गोष्टी नक्की ठेवा सोबत
Summer Trip
Summer TripSakal
  • मेडिकल किट

फिरायला जात असताना बॅगमध्ये मेडिकल किट असणे गरजेचे असते. उन्हाळ्यात अनेकांना ताप, उलट्या यासारख्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. प्रवास करताना उलट्या किंवा उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी तुम्ही ORS सोबत ठेऊ शकता.

  • थंड पाण्याची बाटली

उन्हाळ्यात फिरायला जाताना बॅगमध्ये नेहमी पाण्याची बाटली ठेवावी. उन्हाळ्यात बाहेर फिरायला गेल्यावर खूप तहान लागते.

जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जात असाल तर सर्वात पहिले सामान्य बाटलीऐवजी थंड पाण्याची बाटलीसोबत ठेवावी. बाजारात अतिशय चांगल्या पाण्याच्या बाटल्या कमी किमतीत मिळतात, ज्यामध्ये अनेक तास पाणी थंड राहते. पुरेसे पाणी प्यायल्याने तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या जाणवणार नाही.

  • इतर गोष्टीही ठेवा लक्षात

उन्हाळ्यात प्रवासासाठी तुम्ही हेल्दी फूड पॅक करू शकता. पण तेलकट पदार्थ सोबत घेऊ नका.

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाताना सनग्लासेससोबत घ्यायला विसरू नका.

डोक्याचे रक्षण करण्यासाठी टोपी देखील बॅगमध्ये पॅक करावी.

प्रवासात पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करावे.

दिवसभर फिरून तळपायाची आग होत असेल तर रात्री झोपताना खोबरेल तेल लावावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com