बेस्ट टुरिझम व्हिलेज अ‍ॅवॉर्ड; यंदा MPतील गावाला नामांकन

बेस्ट टुरिझम व्हिलेज अ‍ॅवॉर्ड; यंदा MPतील गावाला नामांकन
Updated on
Summary

ओरछा जवळ लाडपुरा गाव आहे. हे गाव देशातील तीन सर्वोत्तम पर्यटन गावांमध्ये समाविष्ट होणार आहे.

मध्य प्रदेशातील ओरछा जिल्हा पुन्हा एकदा जगाच्या पर्यटन नकाशावर नवी ओळख निर्माण करणार आहे. ओरछा जवळ लाडपुरा गाव आहे. हे गाव देशातील तीन सर्वोत्तम पर्यटन गावांमध्ये समाविष्ट होणार आहे. या गावाला जागतिक पर्यटन संघटनेच्या (UNWTO) बेस्ट टुरिझम विलेज अवॉर्डसाठी नामांकन मिळाले आहे. याबाबत गावातील लोकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. येथील हवामान, नैसर्गिक सौंदर्य, राहणीमान आणि अन्न अशा पर्यटकांना आकर्षित करते.

बेस्ट टुरिझम व्हिलेज अ‍ॅवॉर्ड; यंदा MPतील गावाला नामांकन
कोकणातील 'सुगरणींचं गाव' तुळशी; पाहा व्हिडिओ

लाडपुरा गावाची लोकसंख्या 1110 आहे. यातील 80 टक्के लोक सुशिक्षित आहेत. लोक यासाठी आकर्षित होतात, कारण येथे भरपूर नैसर्गिक सौंदर्य आहे. येथे जंगले, तलाव आणि पर्वत आहेत, तसेच लोककला आणि लोकसंस्कृती देखील अद्वितीय आहे. येथे चौसर, गील्ली-दांडा, कबड्डी असे अनेक खेळ पर्यटकांना खेळायला दिले जातात. सायंकाळी पर्यटक बुंदेली लोकगीते, राय-गोटे आणि फाग सारख्या कार्यक्रमांचा आनंद घेतात.

बेस्ट टुरिझम व्हिलेज अ‍ॅवॉर्ड; यंदा MPतील गावाला नामांकन
सोलंकरवाडी होतेय राज्यातील तिसरे 'अभ्यासाचे गाव' !

लाडपुराच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पर्यटन विभागाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणतात की, मध्य प्रदेश राज्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. आपले राज्य नैसर्गिक सौंदर्यासह अद्भुत स्थापित कलेने समृद्ध आहे. या गावाचे नैसर्गिक सौंदर्य आणि खाद्य पर्यटकांचे आवडते ठिकाण बनत आहे.

बेस्ट टुरिझम व्हिलेज अ‍ॅवॉर्ड; यंदा MPतील गावाला नामांकन
'ती' एक दुर्दैवी घटना आणि गाव झाले कायमचे तंबाखूमुक्त!

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, संपूर्ण देशात या पुरस्कारासाठी फक्त 3 गावे निवडली गेली आहेत. यामध्ये मेघालयातील कांती कांगटोंग गाव, तेलंगणातील पंचमपेली गाव आणि राज्यातील लाडपुरा गावाचा समावेश आहे. मध्य प्रदेशसाठी हे मोठे यश असल्याचे वर्णन केले जात आहे.

बेस्ट टुरिझम व्हिलेज अ‍ॅवॉर्ड; यंदा MPतील गावाला नामांकन
भारतातील सर्वात श्रीमंत गाव! बॅंकात ग्रामस्थांचे 5000 कोटी

ओरछापासून 8 किमी अंतरावर असलेल्या या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील आर्थिक विकासात महिलांचे योगदान आहे. येथील अनेक महिला ई-रिक्षा चालवतात आणि कुटुंबाच्या आणि गावाच्या विकासात मदत करतात. या गावाच्या किर्तीमुळे येथे पर्यटन वाढत आहे. यामुळे येथील लोकांचे जीवन बदलत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com