
उत्तराखंड,नैनीताल, मसूरी या ठिकाणांना भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये लक्षणिय वाढ झाली आहे. या ठिकाणी असलेल्या बर्फाळ प्रदेशाच्या लोक प्रेमात पडतात. नैनीतालमध्ये अनेक प्रसिद्ध सरोवरे आहेत. ज्यांचे सौंदर्य हिवाळ्यात अधिकच खुलते. अशा ठिकाणी गेल्यानंतर हे सौंदर्य जर हेलिकॉप्टरने पहायला मिळालं तर वेगळाच अनुभव गाठीशी बांधता येईल. पर्यटकांची हिच इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
उत्तराखंडची राजधानी देहारादूनपासून नैनीताल, मसूरी आणि बागेश्वर ही सफर हेलिकॉप्टरने करता येणार आहे. त्यासाठी उतराखंड नागरिक उड्डान विकास प्राधिकरण (यूकाडा) ने सर्व तयारी केली आहे. आगामी निवडणुका आणि आचारसंहीता संपल्यानंतर लगेचच ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. (Uttarakhand Tourism News)