
मित्रांसोबत, जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत प्रवास करण्याची एक वेगळीच मजा आहे. पण, काही लोकांना फॅमिलीसोबत जाणे कटकट वाटू शकते. त्यामुळे काही लोकांना एकट्याने प्रवास करायला आवडते. तुम्हाला एकट्याने फिरण्याची आवड असेल तर आज अशा ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात ज्या सोलो ट्रिपसाठी एकदम परफेक्ट डेस्टिनेशन आहेत.
● पाँडिचेरी
तुम्हाला भारतातील फ्रान्स पहायचे असेल तर तूम्ही पाँडिचेरीला नक्की जा. पाँडिचेरी ही फार पूर्वी फ्रान्सची वसाहत होती. इथल्या वास्तुकलेवर फ्रान्सचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. पाँडिचेरीमधील समुद्रकिनारे अतिशय शांत आहेत. तुम्हाला बसने फिरायचे नसल्यास सायकल भाड्याने घेऊन फ्रेंच शैलीमध्ये बनविलेले पाँडिचेरी सहजपणे फिरू शकता. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ पाँडिचेरीला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो.
● गोकर्ण
कर्नाटकातील कन्नड जिल्ह्यात असलेल्या गोकर्णला ऐतिहासिक महत्त्व आहे. येथील सुंदर आणि अनपेक्षित समुद्रकिनारेही प्रसिद्ध आहेत. हे ठिकाण हिंदू तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवरील पार्ट्या आणि बोनफायर नाइट्सची चर्चा अधिक होते. गोकर्णमधील समुद्रकिनारे एकमेकांना जोडलेले आहेत. गोकर्णला जाण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आहे.
● कासोल
हिमाचल प्रदेशातील कासोलमध्ये पावसाळ्यात तुम्हाला एक अविस्मरणीय अनुभूती मिळेल. निसर्गाचे सौंदर्य अगदी जवळून अनुभवण्यासाठी कसोलला भेट दिलीच पाहिजे. तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर, पार्वती नदीच्या खोऱ्यांमध्ये वसलेले कासोलहे ठिकाण राफ्टिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे.
● खजियार
खजियार तलाव हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यामध्ये सुमद्र सपाटीपासून 1,920 मीटर उंचावर आहे. याच्या चारही बाजूंना असलेल्या देवनार वृक्षांची तलावाच्या निळ्याशार पाण्यामध्ये अत्यंत सुंदर प्रतिमा उमटते. ते दृश्य अप्रतिम दिसतं. येथील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे, तलावामध्ये तरंगणारा गवताचा गुच्छ. निळ्याशार पाण्यामध्ये तरंगणारा हा गुच्छ पाहायला फार सुंदर दिसतो. खजियारमद्ये गेल्यानंतर तेथील निसर्गसौंदर्य पाहून तुम्हाला खरचं स्वित्झर्लंडमध्ये गेल्याचा आनंद होईल. 'मिनी स्वित्झर्लन्ड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खजियारमध्ये तुम्ही अॅडव्हेचरही करू शकता
● लाहुल-स्पिती
लाहुल-स्पिती हा हिमाचल प्रदेशचा उत्तर- ईशान्य असा पसरलेला भाग. या परिसरात हिमालयाची सुंदर आणि रौद्र रूपे एकाच वेळी अनुभवयास मिळतात. ‘लाहौल स्पिती’ म्हणजे हिमाचल प्रदेशमधील दुर्गम भागातील एक पर्यटनस्थळ. स्पितीचा अर्थ ‘मध्यवर्ती भूभाग’ असा होतो. ज्यांना भटकंतीची मुळातच आवड आहे अशांसाठी मनापासून आवड असणाऱ्यांसाठी हा भाग म्हणजे पर्यटनाचा स्वर्गच. चंद्रतालजवळ तूम्ही कँपिंग करू शकता तर ग्लेशियरचे सुंदर तलाव पाहू शकता. नोव्हेंबर ते मे या हिवाळ्याच्या काळात हिमवर्षांवामुळे स्पितीचा मार्ग बंद असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.