Travel Blog : उत्तराखंडमध्ये दडलंय सिक्रेट स्विमींग पूल ; आनंद महिंद्रांनाही जायचंय तिथं

उत्तराखंड हे टुरीस्टचे आवडते ठिकाण
Travel Blog
Travel Blogesakal

पुणे : उत्तराखंड हे टुरीस्टचे आवडते ठिकाण असले तरी तिथले काही सिक्रेट प्लेस आजही फार कमी लोकांना माहीती आहेत. उत्तराखंडमधील एका उंच टेकडीवर जिथून समोर पाहील्यास केवळ पर्वतरांगा आहेत. अशा ठिकाणी कोणी तूम्हाला मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटायला सांगितला तर त्याहून वेगळा आनंद तो काय असेल.

Travel Blog
Travel Blog : ‘नभ उतरू आलं’ फिलींग घ्यायचं असेल तर कूर्गला गेलंच पाहिजे!

भारतात अशी अनेक लक्झरी हॉटेल्स आहेत जिथे तुम्हाला खूप मोठे आणि चांगले स्विमिंग पूल पाहायला मिळतील. आता तर प्रत्येकाच्या घरात आणि सोसोयटीमध्येही प्रशस्त पूल आहेत. पण तुम्ही कधी अशा स्विमिंग पूलवर गेला आहात का? , नाही ना?, मग आझ उत्तराखंडमध्ये असलेल्या नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या स्विमिंग पूलचा बद्दल जाणून घेऊयात.

Travel Blog
Travel Blog: बॅग भरो,निकल पडो; भारतापासून 4 तासाच्या अंतरावर असलेल्या देशात जायलाच पाहिजे!

उत्तराखंडमधील धारचुला येथील खेल या गावात नॅचरल स्विमींग पूल आहे. जंगलातून येणार्‍या नितळ, स्वच्छ, थंड पाण्याने हा पूल तयार झाला आहे. या पूलमध्ये पोहण्यात मिळणारी मजा इतर कोणत्याही हॉटेल किंवा घरात येणार नाही.

Travel Blog
Travel Blog : सातारा बनतंय प्री-वेडींग डेस्टीनेशनचे माहेरघर ;होतेय फोटोग्राफरची गर्दी

उत्तराखंडमधील या नॅचरल स्विमींग पुलाचा फोटो 2021 मध्ये त्याच गावातील नरेश धामी या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तो फोटो पाहुन प्रसिद्ध बिझनेसमन आनंद महिंद्रा यांनी रिट्विट केले होते. 'हा पूल पाहण्यासाठी मी उत्सुक असून त्यासाठी मी अजून प्रतीक्षा करू शकत नाही. यापूर्वी मी असे अद्भुत काही काहीही पाहिले नाही. ते माझ्या प्रवासाच्या बकेट लिस्टमध्ये आहे. तेव्हापासून हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र बनले आहे, असे ते म्हणाले होते. त्यावेळपासून हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

Travel Blog
Travel Blog : चवदार पदार्थांवर ताव मारायला 'या' ठिकाणी गेलंच पाहिजे!

या स्विमींगपूलवर जाण्यासाठी तुम्हाला उत्तराखंडमधील धारचुला गाठावे लागेल. यानंतर तुम्हाला धारचुलापासून १८ किमी अंतरावर असलेल्या तवाघाटला जावे लागेल. तुम्ही धारचुला ते तवाघाट टॅक्सीने जाऊ शकता. तवाघाटावर गेल्यावर थोडा ट्रेकींगचा अनुभव घेत डोंगर चढावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com