Travel Blog : सातारा बनतेय प्री-वेडींग डेस्टीनेशनचे माहेरघर ; होतेय फोटोग्राफरची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Travel Blog : सातारा बनतंय प्री-वेडींग डेस्टीनेशनचे माहेरघर ;होतेय फोटोग्राफरची गर्दी

Travel Blog : सातारा बनतंय प्री-वेडींग डेस्टीनेशनचे माहेरघर ;होतेय फोटोग्राफरची गर्दी

हेही वाचा: Travel : स्वस्तात फ्लाइट बुक करायची असेल, तर 'या' सिक्रेट ट्रिक्स नक्की फॉलो करा

पुणे : सध्या लग्नाचे मुहूर्त नसले तरी लग्न ठरवली जात आहेत. दिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त काढून ती लग्न उरकली जातील. आतापासून लग्नाचा मुहूर्त येईपर्यंत वर आणि वधू यांना बराच वेळ मिळतो. या काळात प्री-वेडींग फोटोशूट करण्याचे प्लॅन केले जातात. पण, लोकेशन कोणते असावे, कमी खर्चात चांगले स्पॉट कुठे मिळतील यासाठी गुगल सर्च केले जाते. आधी प्री-वेडींग केलेल्या मित्र-मैत्रिणींना विचारले जाते.

हेही वाचा: Travel : जगातील सहा ठिकाणे जिथे कधीच होत नाही सुर्यास्त; रात्रीही तळपतो सूर्य !

तूम्हीही अशाच लोकेशनच्या शोधात असाल तर पश्चिम महाराष्ट्रात राहणाऱ्यांसाठी हाकेच्या अंतरावर असलेल्या सातारा शहराचा विचार नक्की करा. सातारा हा जिल्हा कृष्णा नदी व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ वसलेले शहर आहे. सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साताऱ्यातील प्री-वेडींगची काही लोकेशन प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वर, ठोसेघर धबधबा, बामणोली डॅम, वाई, संगम माहुली अशी परवडेबल ठिकाणे आहेत.

हेही वाचा: Travel : पिकनिकची तयारी करताय?, नवी मुंबईतील 'या' 7 बेस्ट स्थळांना नक्की भेट द्या

वाई : साताऱ्यातील वाई येथील गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदीराच्या परिसरातील कृष्णा नदीचा घाट प्रीवेडींगसाठी बेस्ट डेस्टीनेशन आहे.

महाबळेश्वर : महाबळेश्वर हे हिलस्टेशन थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात या ठिकाणी बर्फवृष्टी देखील होते. अलिकडे तिथे प्री वेडींग फोटोशूट केले जात आहे. अनेक पॉईंट, वेण्णा लेक तसेच हॉर्स रायडींग करत कपल्स फोटोशूट करतात.

हेही वाचा: Monsoon travel : पावसाळी सहलीसाठी उत्तम आहेत ही ठिकाणे

संगम माहुली : साताऱ्यात प्राचीन मंदिंरांची संख्या जास्त आहे. संगममध्ये असलेल्या माहुली मंदिर प्राचिन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिरात पारंपारिक वेशभुषेत अनेक लोक प्री वेडींग फोटोशुट करतात.

ठोसेगर धबधबा : या ठिकाणी तुम्ही प्री वेडींग फोटो शुट करू शकता. ठोसेघर धबधब्याच्या हिरव्यागार लोकेशनवर वेस्टर्न लुकमध्ये फोटो अधिक खुलून दिसतात.

बामणोली लेक : बामणोली लेक परिसरात तलावात तर फोटो काढता येतातच. पण, त्याच बरोबर रात्रीच्यावेळी टेंटमध्ये फोटोशुट करता येते.