Travel Story :कॉपी करत ‘या’ देशांनीही उभारला प्रती ताजमहाल; पहा फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

travel story

Travel Story :कॉपी करत ‘या’ देशांनीही उभारला प्रती ताजमहाल; पहा फोटो

ताज महालला शहाजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाचे प्रतिक मानले जाते. जगातल्या सात आश्चर्यांमध्ये त्याची गनना होते. यमुना नदी काठी असलेला ताजमहाल हा मोगल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्याच्या रचनेत पर्शियन, ओट्टोमन, भारतीय आणि इस्लामिक कलेचा प्रभाव जाणवतो. (Travel Story Taj mahal copies in other countries )

हेही वाचा: Travel Blog : चवदार पदार्थांवर ताव मारायला 'या' ठिकाणी गेलंच पाहिजे!

ताजमहाल आपल्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. तो पाहण्यासाठी आपण कमी खर्चात दिल्ली जवळ करू शकतो. पण, परदेशी लोकांना मनात येईल तेव्हा ताजमहाल पाहण्यासाठी प्रत्येकवेळी भारतात जायचा खर्च परवडणार नाही. हा विचार करूनच परदेशातही भारताची कॉपी करून ताजमहालची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ते दुधाची तहान ताकावर भागवण्याचे काम प्रती ताजमहालच्या रूपात करण्यात आले आहे.

चीन

आपली कॉपी करण्यात चीनचा हात कोणी पकडू शकत नाही. चीनमधील शेनझेन शहरात ताजमहालची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. या ठिकाणी तुम्हाला ताजमहालसोबत जगातील सात आश्चर्ये सुद्धा एकत्र पहायला मिळतील.

हेही वाचा: Travel : विकेंडसाठी परफेक्ट डेस्टीनेशन आहेत महाराष्ट्रातली 'ही' ठिकाणे

बांगलादेश

बांगलादेशमध्ये चित्रपट निर्माते अहसानुल्ला मोनी यांनी त्यांच्या एका चित्रपटासाठी ताजमहाल उभा केला. पण, हा स्टुडीओतील खोटा ताजमहाल नसून खराखुरा ताज आहे. राजधानी ढाका येथून सुमारे 30 कि.मी. अंतरावर असलेल्या सोनार गावात हुबेहुब ताजसारखी दिसणारी इमारत बांधण्यात आली आहे. हा ताजमहाल उभारण्यासाठी $58 दशलक्ष इतका खर्च करण्यात आला असून त्याचे काम पूर्ण व्हायला 5 वर्ष इतका कालावधी लागला.

दुबई

उंच इमारतींचा देश म्हणून ओळख असलेल्या दुबईत ताजमहालची प्रतिकृती आहे. याला ताजमहाल अरेबिया म्हणतात. ही इमारत एका हॉटेलची असल्याने तुम्ही येथे राहण्याचा आनंद घेऊ शकता.

हेही वाचा: Navratri Travel : भारतात आहे दुर्गामातेचे शापित मंदिर; ओस पडलेल्या मंदिरात जायला घाबरतात भक्त!

ब्रिटन

ब्रिटनमधील ब्राइटनमध्ये ताजमहालासारखीच एक इमारत आहे. त्याचे नाव रॉयल पॅव्हेलियन आहे. ही इमारत ब्राइटनचे सम्राट प्रिन्स जॉर्ज ऑफ वेल्स यांचे निवासस्थान होते.

कॅलिफोर्निया

कॅलिफोर्नियामध्येही ताजमहालची झेरॉक्स कॉपी आहे. 1970 मध्ये जेव्हा व्हाइनयार्ड उद्योजक बिल हार्लन भारतात आले तेव्हा त्यांनी आग्रा येथील ताजमहाल पाहिला आणि ते त्याच्या प्रेमात पडले. कॅलिफोर्नियामध्ये परतल्यावर त्यांनी ताजमहालासारखी दिसणारी हाऊस बोट बनवली. आजही येथे पर्यटकांची गर्दी होते.