

Sakal
baby Vedaa swimming viral video: दोन वर्षांच्या बाळाचे बोबडे बोल आणि त्याचं अडखळत उभं राहणं हे नेहमीच कौतुकाचं कारण असतं. आई-वडिलांना त्याचा खूप आनंद होतो. पण रत्नागिरीतील 1 वर्ष 9 महिन्यांची वेदा सरफरे हिने मोठी कामगिरी केली आहे. ही लहानगी सर्वात लहान जलतरणपटू ठरली आहे. तिने 10 मिनिटांत 100 मीटर अंतर पार करून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, पण वेदाचे पाय पाण्यात दिसले असं कौतुकानं म्हटलं जातंय. तिच्या या अद्वितीय कामगिरीने सध्या कोकणवासीय प्रभावित झाले आहेत.