Viral Video : 31st च्या रात्री तरूणाच्या अंगात घुसला मोर; पिसाराही फुलवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video : 31st च्या रात्री तरूणाच्या अंगात घुसला मोर; पिसाराही फुलवला

आज वर्षातील शेवटचा दिवस आहे. तर ३१ डिसेंबरच्या रात्री अनेकजण दारू पिऊन झिंगाट होत असतात. दारू पिल्यानंतर अनेक तरूणांचे भान हरपते. अशाच एका भान हरपलेल्या तरूणाच्या डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'नाच रे मोरा' या गाण्यावर तरूणाने डान्स केला आहे.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

या व्हिडिओमध्ये तीन ते चार तरूण दिसत आहेत. तर नाच रे मोरा या गाण्यावर ते सगळेजण भन्नाट डान्स करत आहेत. तर या गाण्यावर याआधीसुद्धा अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत पण या तरूणाने आपल्या पाठीवर झाडू लावत त्याला मोराचा तुरा असल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये तरूणाचे पूर्ण भान हरपलं आहे. तो दारू पिऊन देहभान विसरून डान्स करत आहे. तर ३१ डिसेंबरची पार्टी करताना प्रत्येकाने काळजी घेणे महत्त्वाचं आहे. सध्या देशभरात कोरोनाने परत डोकं वर काढलं असून सर्वांनी कोरोनाचे नियम पाळायला हवेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे विसरू नका.