Fri, Feb 3, 2023

31st Memes : नेटकऱ्यांकडून थर्टी फर्स्टच्या मीम्सचा पाऊस, वाचून आवरणार नाही हसू
Published on : 1 January 2023, 6:50 am
31st Memes : कालच्या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशननंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस झालाय. नेटकऱ्यांनी एकापेक्षा एक भारी मिम्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे भन्नाट मीम्स वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
वाचा एकपेक्षा एक भन्नाट मीम्स
१. म्हणून उगाच उड्या मारू नका. फक्त कॅलेंडरचं पान बदलणार आहे. बायको-पोरं, नोकरी अन् पगार तोच. (Social Media)

२. फक्त वर्ष बदलणार आहे. माणसं आणि त्यांच्या अंगातले किडे आहे तसेच राहाणार.
३. आज वर्षा फार घाबरली आहे, कारण जो तो म्हणतोय उद्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे.

४. कृपया दारू पिऊन एटीएममध्ये जाऊ नका. काल रात्री एकाने दोन हजाराची नोट फाडली अन् पांढरी स्लिप खिशात घातली.