Viral : 70 वर्षाच्या सासऱ्याने चक्क 28 वर्षाच्या सूनेसोबतंच थाटला संसार

त्यांच्या लग्नामुळे सर्वजण चकित झाले आहेत.
Viral
Viral Sakal

लखनऊ : उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे एका ७० वर्षीय व्यक्तीने आपल्या २८ वर्षीय सुनेसोबत लग्न केल्याचा प्रकार घडला आहे. त्याची नवी बायको ही त्याच्यापेक्षा तब्बल ४२ वर्षांनी लहान आहे. कैलास यादव असं या वृद्ध नवरदेवाचं नाव आहे.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

अधिक माहितीनुसार, कैलास यादव हा व्यक्ती बडहलगंड ठाण्याचा चौकीदार असून छपिया उमराव गावचा रहिवाशी आहे. तब्बल १२ वर्षापूर्वी त्याच्या बायकोचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर त्याचे काही दिवसांपूर्वी सूनेवरच प्रेम जडले होते. त्यानंतर त्याने मंदिरात जाऊन आपल्या सूनेसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्याच्या या कारनाम्यामुळे परिसरातील लोकं आश्चर्यचकित झाले असून त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Viral
Viral Video : जंगलाचा राजा थेट घरात; डरकाळी पाहून अंगावर काटा येईल

मुलाचा झाला आहे मृत्यू

कैलास यादव या वृद्धाच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्याला चार मुले असून तिसऱ्या मुलाच्या मृत्यूमुळे ही सून विधवा झाली होती. त्यानंतर कैलास याचे सूनेवर प्रेम जडले. त्यानंतर त्याने परिवाराची किंवा नातेवाईकांची पर्वा न करता सूनेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि मंदिरात जाऊन थेट लग्न लावले. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं असून यासंबंधी अजून कुणीही तक्रार दिली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com