
Tarachand Agarwal: A 71-Year-Old Who Cracked the CA Final Exam: जिद्द आणि चिकाटीला जर योग्य मेहनतीची जोड मिळाली तर या जगात काहीच अशक्य नाही, असं म्हटलं जातं. तसेच, कोणतंही शिक्षण घेण्यासाठी कधीच वयाचं बंधन नसतं, फक्त शिकण्याची प्रामाणिक इच्छा आणि तळमळ असावी लागते. याचाच प्रत्यत एका उदाहरणातून आज जगासमोर आला आहे.
आज भारतातील अनेक कठीण आणि तेवढ्याच प्रतीष्ठेच्या परीक्षांपैकी एक ‘सीए’ म्हणजेच चार्टंड अकाउंटटची परीक्षा आहे. ही परीक्षा पास करण्यासाठी विद्यार्थी वर्षानुवर्षे दिवसरात्र एक करत अभ्यास करतात. यासाठी स्पेशल क्लासेसही लावले जातात, अभ्यासाव्यतिरिक्त दुसरं कशात डोकंही लावत नाहीत. पण तरीह दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांपैकी फार थोड्या जणांना ही कठीण परीक्षा पास करता येते.
खरंतर सीए व्हायचं स्वप्न हे विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्येच पाहतात आणि त्यादृष्टीने योजनाही आखतात. परंतु आज आपल्यासमोर असं एक उदाहरण आलं आहे, ज्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. वयाच्या सत्तरीनंतर सीए परीक्षा पास होण्याची कामगिरी ताराचंद अग्रवाल यांनी करून दाखवली आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे. सोशल मीडिया पासून ते सर्व प्रकारच्या मीडियामध्ये त्यांच्या बातम्या झळकत आहेत.
कारण, ज्या वयात लोकांना निवृत्तीनंतर शांत जीवन जगायचे असते, त्या वयात जयपूरच्या ताराचंद अग्रवाल यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला, जे त्यांनी वर्षानुवर्षे सोडून दिले होते. ताराचंद अग्रवाल वयाच्या ७१ व्या वर्षी सीए अंतिम परीक्षा उत्तीर्ण आले आहेत.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने ६ जुलै रोजी, जेव्हा सीए अंतिम २०२५ चा निकाल जाहीर केला, तेव्हा ताराचंद अग्रवाल यांचे नाव केवळ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १४,२४७ उमेदवारांमध्ये समाविष्ट नव्हते, तर ते सर्वाधिक चर्चेत होते.
विशेष बाब म्हणजे ताराचंद स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूरमधून खूप पूर्वी निवृत्त झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी त्यांच्या नातीच्या प्रेरणेने सीए परीक्षेची तयारी सुरू केली. जेव्हा नातीने सीएची तयारी सुरू केली तेव्हा ताराचंद स्वतः पुस्तके आणि बॅलन्स शीटकडे आकर्षित झाले होते.
सीए निखलेश कटारिया यांनी लिंक्डइनवर ताराचंद अग्रवाल यांचा प्रवास शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'जिथे इच्छा असते, तिथे मार्ग असतो'. त्यांची पोस्ट खूप वेगाने व्हायरल झाली आहे, ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या वर्षी मुंबईतील राजन काब्राने सीए फायनलमध्ये ६०० पैकी ५१६ (८६टक्के) गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवला आहे. तर निष्ठा बोथरा दुसऱ्या स्थानावर आणि मानव राकेश शाह तिसऱ्या स्थानावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.