

American Content Creator Kristen Fischer Praises Indian Kirana Stores
esakal
Kristen Fischer Viral Video: भारतातील दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी परदेशी नागरिकांसाठी आश्चर्याचा विषय ठरतात. भारतात राहणाऱ्या अमेरिकन कंटेंट क्रिएटर क्रिस्टन फिशर हिलाही येथील एका खास गोष्टीने प्रभावित केले आहे. भारतातील छोटी किराणा दुकाने, त्यांची सहज उपलब्धता आणि खरेदीसाठी लागणारा कमी वेळ याचे तिने भरभरून कौतुक केले आहे. तिचा यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून, भारतीयांनीही या सुविधेचे महत्त्व ओळखायला हवे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.