

Ankit Ashish Mishra UPSC Success Story
Ankit Ashish Mishra UPSC Success Story : आर्थिक परिस्थिती हलाखीची असली, तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठता येतं, हे झारखंडमधील अंकित आशीष मिश्रा यांनी सिद्ध केलं आहे. कुटुंबाच्या गरिबीमुळे नातेवाईकांच्या लग्नाला निमंत्रण नाकारलं गेल्याचा अपमान त्यांनी आपली कमजोरी न मानता ताकद बनवली. अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) CAPF परीक्षा उत्तीर्ण करत ऑल इंडिया रँक (AIR) २३६ मिळवली. या यशामुळे त्यांची क्लास-१ अधिकारी म्हणून निवड झाली. अंकित याचा संघर्षमय प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.