

Minor boy and girl were stopped and misbehaved on the road in Jamui
esakal
Jamui Minor Assault Case : बिहारच्या जमुई जिल्ह्यात अल्पवयीन मुलगा आणि मुलीला रस्त्यात अडवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ही घटना घडली. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने प्रकरण उघडकीस आले. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून (Suo Motu) दखल घेत तपास सुरू केला असून, आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.