

Green Chemical Cucumber
esakal
Social Media: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन, बस स्थानकं आणि बाजारपेठांमध्ये काकडीला मोठी मागणी असते. थंड आणि आरोग्यदायी समजून अनेक प्रवासी काकडी आवडीने खातात. मात्र, सध्या सोशल मीडियावर मनात धडकी भरवणारा एक व्हिडीओ चांगलाय व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये एका महिलेने पांढऱ्या पडलेल्या शिळ्या काकड्यांना अवघ्या काही सेकंदात एका रसायनाच्या मदतीने कृत्रिमरित्या हिरवंगार आणि ताजं केल्याचे दिसून येतंय.