Viral Video : सावधान! नजर हटी दुर्घटना घटी; गाडी चालवताना लक्ष असू द्या नाहीतर...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral Video Sakal

सावधान! नजर हटी दुर्घटना घटी... असे वाक्य आपण प्रवास करत असताना रस्त्यावर लावलेले आपल्याला दिसतील. पण अनेकदा आपलं लक्ष नसल्यामुळे अपघात झाल्याच्या घटना घडतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका तरूणीचं लक्ष नसल्यामुळे तिचा अपघात झाला.

Viral Video
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सीसीटीव्ही फुटेजमधील असून त्यामध्ये एक तरूणी दुचाकीवरून जात असताना तिचे लक्ष नसल्यामुळे ती वेट लिफ्टर मशिनच्या पुढच्या भागाला जाऊन धडकते. यामध्ये तिला चांगलीच दुखापत झाली. अपघातानंतर लगेच ड्रायव्हरने धावत जाऊन या तरूणीला मदत केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वाहन चालवताना आपलं लक्ष असणे किती महत्त्वाचं असतं हे या व्हिडिओमधून दिसून येते. वाहने चालवताना लक्ष नसणे जिवावर बेतू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com