Bisrakh Dussehra : एक गाव असंही.., जिथं दसऱ्याला लोक रडतात अन् रावणाचे दहनही करत नाहीत; कारण...

Why Ravan is Worshipped in Bisrakh : जाणून घ्या, नेमकं कुठं आहे असं गाव आणि तेथील लोक का करत नाहीत रावणाचे दहन?
Ravan

Ravan

esakal

Updated on

Ravan Birthplace history: देशभर उद्या(गुरुवार) सर्वत्र विजयादशमी अर्थात दसरा हा सण साजरा केला जातो. या दिवशी वाईटचा नाश म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. शिवाय लोक सोन म्हणून एकमेकांना आपट्याची पाने देत, दसऱ्याच्या शुभेच्छाही देत असतात.

मात्र उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडात एक गाव असंही आहे जिथे दसऱ्याच्या दिवशी आनंदोत्सव नव्हे तर शोक मानला जातो आणि ते गाव आहे बिसरख, जे पौराणिक मान्यतांनुसार रावणाचे जन्मस्थळ मानले जाते. त्यामुळेच इथे रावणाच्या पुतळ्याचे दहन होत नाही, तर उलट त्याची विद्वता आणि अफाट ज्ञानाबद्दल पूजा केली जाते. 

काय आहे बिसरखचा इतिहास आणि मान्यता? -

स्थानिक रहिवासी आणि पौराणिक कथांनुसार, बिसरख गावाचे नाव रावणाचे पिता ऋषि विश्रवा यांच्या नावावरून पडले. याचे प्राचीन नाव विश्वेशरा होते, ज्यात कालानुरूप बदल होवून बिसरख झाले. नोएडाच्या शासकीय गॅझेटमध्येही या गावाच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष नमूद आहे. एवढंच नाहीतर शिवपुराणातही या ठिकाणाचा उल्लेख आढळतो, जिथे सांगितले गेले आहे की, त्रेता युगात याच गावात ऋषी विश्रवा यांचा जन्म झाला आणि त्यांनीच येथे एका शिवलिंगाची स्थापना केली होती.

Ravan
Uddhav Thackeray Press : उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याआधीच महायुती सरकारवर डागली तोफ; शेतकऱ्यांच्या मुद्य्यावर विचारला जाब!

तर मंदिराचे मुख्य पुजारी रामदास सांगतात, ही रावणाची जन्मभूमी आहे. हे स्थान ऋषी पुलस्त्य मुनी यांचा आश्रम होते. या ठिकाणी स्थापित शिवलिंग स्वयं प्रकट झाले होते, ज्याची सेवा ऋषी विश्रवा यांनी केली. या ठिकाणीच ऋषी विश्रवाचे पुत्र रावण, कुंभकर्ण, विभीषण आणि कन्या शूर्पणखा यांचा जन्म झाला होता.

दसऱ्याच्या दिवशी होते विशेष पूजा -

बिसरखची सर्वात वेगळी परंपरा म्हणजे येथील दसरा साजरा करण्याची पद्धत. देशभरात जेव्हा अतिशय उत्साहात, धुमधडाक्यात रावणाचे दहन केले जाते, तेच बिसरखमध्ये लोक रावणाच्या मृत्यूवर शोक व्यक्त करतात. पुजारी सांगतात, या ठिकाणी दसरा साजरा होतो, परंतु रावणाच्या पुतळ्याचे दहन होत नाही. यज्ञशाळेसमोर रावणाची मूर्ती ठेवून हवन आणि पूजा होते, आम्ही रावणाचा पुतळा जाळत नाही.

Ravan
Aravind Srinivas India’s youngest billionaire : भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश अरविंद श्रीनिवास आहेत तरी कोण, किती आहे संपत्ती?

या ठिकाणचे ग्रामस्थ रावणाला आपला पूर्वज मानतात. त्यामुळे ते रावणाचे दहन करत नाहीत, तर पूजन करतात. आधी ही मान्यता केवळ स्थानिक स्तरापर्यंत मर्यादित होती. परंतु बदलत्या काळानुसार सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे या गावाची कहाणी आता सातासमुद्रपारही पोहचली आहे. या ठिकाणचे मंदिर केवळ आस्थेचा विषयच राहिलेले नाही, तर जगभरातील पर्यटक आणि जिज्ञासू लोकांसाठी आकर्षण केंद्र बनले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com