Heartwarming Story : उपाशीपोटी ३ किलोमीटर चालत जाऊन दिली फूड डिलिव्हरी; लिंक्ड इनवर स्टोरी शेअर होताच बदललं नशीब!

इंटरनेटची ताकद किती आहे, याची कित्येक उदाहरणं आपण वेळोवेळी पाहत असतो. याचाच प्रत्यय साहिल नावाच्या एका तरुणाला आला.
Swiggy Delivery Boy Heartwarming Story
Swiggy Delivery Boy Heartwarming StoryeSakal

इंटरनेटची ताकद किती आहे, याची कित्येक उदाहरणं आपण वेळोवेळी पाहत असतो. याचाच प्रत्यय साहिल नावाच्या एका तरुणाला आला. इंजिनिअरिंगची डिग्री असूनही हा तरुण स्विग्गीमध्ये काम करत होता. या तरुणाने स्वतः उपाशी पोटी असताना तब्बल तीन किलोमीटर चालत जाऊन फूड डिलिव्हरी दिली होती. याबाबत एका तरुणीने लिंक्ड-इनवर पोस्ट केली होती. यानंतर आता या तरुणाला नोकरी मिळाली आहे.

एका टेक कंपनीत मार्केटिंग मॅनेजर असलेल्या प्रियांशी चंदेल यांनी ही स्टोरी शेअर केली आहे. त्यांनी एक दिवस स्विग्गीवरून आईस्क्रीम मागवलं होतं. तेव्हा साहिल नावाचा हा तरुण त्याची डिलिव्हरी घेऊन आला होता. त्याला येण्यासाठी सुमारे ४० मिनिटं लागली. एवढा वेळ लागण्याचं कारण म्हणजे, तो तब्बल तीन किलोमीटर चालत आला होता. यानंतर त्याने जे सांगितलं ते प्रियांशी यांनी साहिलच्याच शब्दात मांडलं होतं.

साहिल सांगतो, "मॅम, माझ्याकडे स्कूटी किंवा दुसरं कोणतंच वाहन नाही. मी युलू बाईकच्या रिचार्जसाठी पैसे ठेवले होते, मात्र ते पैसे माझा फ्लॅटमेट घेऊन गेल्यामुळे आता मीच २३५ रुपये कर्जात आहे. माझ्याकडे आता घरमालकाला द्यायलाही पैसे नाहीत. तुम्हाला वाटत असेल मी खोटं बोलतोय, मात्र मी खरंच ECE ग्रॅज्युएट आहे. मी निंजाकार्ट, बायजूस अशा कंपन्यांमध्ये काम केलंय. कोरोनामध्ये लॉकडाऊनमुळे मला नोकरी सोडून माझ्या घरी, जम्मूला जावं लागलं."

LinkedIn Post by Priyanshi Chandel
LinkedIn Post by Priyanshi ChandeleSakal

तो पुढे म्हणाला, "या ऑर्डरसाठी मला केवळ २० ते २५ रुपये मिळतील. मी १२ वाजेच्या आत दुसरी ऑर्डर घेतली नाही, तर मला आणखी दूर डिलिव्हरीसाठी जावं लागेल. मी एक आठवड्यापासून काहीही खाल्लेलं नाही, फक्त पाणी आणि चहावर जगतोय. मी तुम्हाला पैसे नाही मागत, मात्र प्लीज मला नोकरी शोधण्यासाठी मदत करा. मी आधी महिन्याला २५ हजार रुपये कमवायचो. मी ३० वर्षांचा आहे, आणि माझे आई-वडील म्हातारे झालेत. मी आता त्यांच्याकडे पैसे नाही मागू शकत."

साहिलचं बोलणं ऐकून प्रियांशी यांनी त्याला पाणी आणि ५०० रुपये दिले होते. मात्र, सोबतच त्यांनी त्याची स्टोरी, त्याचे फोटो आणि डिग्री-सर्टिफिकेट लिंक्डइनवर पोस्ट केले होते. "जर कोणाकडे ऑफिस बॉय, अ‍ॅडमिन, कस्टमर सपोर्ट अशा कामासाठी व्हेकन्सी असेल तर कृपया याची मदत करा." असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. सोबतच साहिलचे कॉन्टॅक्ट डीटेल्सही त्यांनी दिले होते.

मदतीचा वर्षाव, जॉबही मिळाला

यानंतर कित्येक लोकांनी साहिलसाठी मदतीचा हात पुढे केला. एका व्यक्तीने त्याच्या युलू बाईकचा रिचार्ज केला, तर दुसऱ्या व्यक्तीने त्याला राहण्यासाठी जागा ऑफर केली. काही व्यक्तींनी त्याला नोकरीही ऑफर केली. यानंतर प्रियांशी यांनी लिंक्ड-इनवर एक अपडेट शेअर करत साहिलला आता नोकरी मिळाल्याचं सांगितलं. "त्याला नोकरी मिळाली!! मदतीसाठी पुढे आलेल्या सर्वांचे आभार, तुम्ही सर्व खरंच खूप मस्त आहात" असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com