

Shivaji Maharaj AI Video Hindvi Swarajya Rise Maratha Empire History Viral
esakal
Chhatrapati Shivaji Maharaj Viral Video : AI टेक्नोलॉजीने इतिहासाला नवे जीवन दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील भव्य दिव्य दृश्ये डोळ्यांसमोर उभी करणारा एक आश्चर्यकारक AI वापरुन बनवलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कसं होतं हिंदवी स्वराज्य? अशा टायटलने हा व्हिडिओ "Maratha Empire" या यूट्यूब चॅनलवर पब्लिश करण्यात आला असून अवघ्या काही दिवसांत त्याला हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळालेत. खरे मराठे असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहाच असा मेसेज शिवभक्तांमध्ये व्हायरल होत आहे.