

Snakes seen swimming in floodwaters after Typhoon Mesak destroyed a breeding farm in Guangxi, China,
esakal
चीनमध्ये टायफून 'मेसाक'मुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे गुआंग्शी प्रांतातील हेंगझोऊ शहरातील डेंगवेई गावात एक भयावह घटना घडली आहे. एका सापांच्या प्रजनन केंद्रातून सुमारे ८०० ते ९०० साप पुराच्या पाण्यात वाहून गेले. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत पसरली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये साप पुराच्या प्रवाहात पोहताना दिसत आहेत.