Viral Video : भर रस्त्यावर स्पोर्ट्स बाईकवर कपलचा रोमान्स; गाडीवरच प्रपोजही केलं

Viral Video
Viral VideoSakal

अनेकजण गाडीवर काहीतरी स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतात. गाडीचे पुढचे चाक उचलून गाडी चालवण्याचे अनेक प्रकार आपण पाहिले असतील. तर आपल्या प्रेयसीला आपल्या गाडीवर पुढे बसून स्टंट करणाऱ्या युवकांचे फोटो सोशल मीडियावर याआधीही व्हायरल झाले होते. पण सध्या एका तरूणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा - ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कपल गाडीवर बसून रोमान्स करताना दिसत आहे. तर युवक आणि युवती दोघांनीही हेल्मेट घातले आहे. त्यानंतर युवक युवतीला प्रपोज करतानाही या व्हिडिओत दिसत आहे. विशेष म्हणजे दोघेही स्पोर्ट बाईक रायडर असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर अनेक नेटकऱ्यांनी यावर आपल्या कमेंट केल्या आहेत. काही युजर्सने या कपलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर तरूणांनी असे स्टंट करण्याआधी खबरदारी घेतली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com