CCTV Footage : चोरी करण्यासाठी महिलेने सोनाराच्या चेहऱ्यावर मारला स्प्रे पण...; घटना कॅमेऱ्यात कैद

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विनोदी कमेंट केल्या आहेत.
Viral Video
Viral VideoSakal

चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील किंवा आपल्या एकाद्या वस्तूची चोरी अनेकदा झाली असेल. प्रवास करताना पाकीट चोरीला जाणे किंवा एखादी वस्तू चोरला जाण्याच्या घटना घडत असतात. एखाद्या दुकानात चोरी झाल्याचे प्रकार अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक महिला सोन्याच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला सोन्याच्या दुकानात येते. दुकानदार महिलेला सोन्याच्या वस्तू दाखवत असताना महिला तिच्या पर्समधून एक स्प्रे काढते आणि दुकानदाराच्या चेहऱ्यावर मारते. दुकानदाराच्या डोळ्यात गेल्यामुळे तो विचलीत होतो. पण लगेच तत्परता दाखवत बाहेर येऊन या महिलेवर प्रतिहल्ला करतो. या प्रतिहल्ल्यात ही महिला जखमी झाली आहे.

Viral Video
Ganpati Visarjan : 'विसर्जन मिरवणुकीत डान्स करण्यासाठी मुले-मुली हवेत!' पुण्यातील जाहिरात व्हायरल

दरम्यान, चोरीचा प्लॅन करून आलेली महिला दुकानदाराच्या तत्परतेमुळे पकडली गेली असून तिचा प्लॅन फसला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर "चोरी करण्याची प्रॅक्टीस करून तरी जायचं" अशा विनोदी प्रतिक्रियासुद्धा काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com