Dance Viral Video : युगांडातल्या सलमान, गोविंदाची धमाल; कॅटरीनाची अदा बघून व्हाल घायाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dance Viral Video

Dance Viral Video : युगांडातल्या सलमान, गोविंदाची धमाल; कॅटरीनाची अदा बघून व्हाल घायाळ

Uganda Kids Dancing On Bollywood Song : सध्या सोशल मीडिया हा जगभरात पोहचण्याचं सोपं माध्यम झालं आहे. त्यामुळे जगातल्या एखाद्या कोपऱ्यातलं टॅलेंटपण दुसऱ्या भागांमध्ये क्षणात पोहचतात. बॉलिवूडच्या गाण्यांच्या बाबत हे कायमच बघायला मिळतं. जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतून त्यावर वेगवेगळे व्हिडीओज बघायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पार्टनर सिनेमातल्या सोनी दे नखरे गाण्यावर युगांडातल्या सलमान आणि गोविंदाने केलेला धमाल डांस सगळ्यांनाच भूरळ पाडत आहे. त्यात दूधात साखर पडावी तशी कॅटरीनाची अदा घायाळ करत आहे. हा व्हिडीओ सगळीकडे फार पसंत केला जात आहे.

हेही वाचा: Viral Video : पठ्ठ्याने केला नाद! शाम्पू लावून घातली नागाला अंघोळ

हा व्हिडीओ आहे युगांडाच्या शाळकरी मुलांचा आहे. या मुलांचा डांस सगळ्यांनाच वेड लावत आहे. त्यांचे मूव्हज, काँफीडंस आणि एक्सप्रेशन्स वाह वा मिळवत आहेत.

या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहेत. त्याला लाखोने व्ह्यूज मिळाले असून हजारोने त्याला लाइक्स केले गेले आहे.

टॅग्स :viral video