Viral Video: देशी नानीला मेकअप कसा हवाय? उत्तर ऐकून पोट धरून हसाल | deshi nani cute banter with makeup artist viral video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video: देशी नानीला मेकअप कसा हवाय? उत्तर ऐकून पोट धरून हसाल

सोशल मीडियावर एका आजीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ही आजी पार्टी किंवा लग्नासाठी तयार होत असताना दिसत आहे. तर मेकअप आर्टिस्ट असलेल्या जसमीन कौरने इन्स्टाग्रामवर या आजीचा व्हिडिओ शेअर केला आहे. आजीच्या बोलण्यावर पार्लरमध्ये हशा पिकल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

(Social Media Grandmother Viral Video)

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक आजी पार्लरमध्ये मेकअप करण्यासाठी आली आहे. एक मुलगी आजीला मेकअप कसा हवाय असं विचारते. तेव्हा ती मजेशीर उत्तर देते. "मला काही नाही पाहिजे, फक्त थोडा हलका हलका मेकअप करा, मी तर अशीच सुंदर आहे" आजीच्या या उत्तरामुळे तिथे हशा पिकल्याचं दिसतंय. तर मेकअप झाल्यावर ती आजी मेकअप आर्टिस्टला मिठी मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला असून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: Viral Video : पठ्ठ्याने केला नाद! शाम्पू लावून घातली नागाला अंघोळ

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.