
एका म्हशीमुळे दोन राज्यातील गावांमध्ये महाभारत घडले आहे. कर्नाटकातील बल्लारी तालुक्यातील बोम्मनहल गाव आणि आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील मेदेहल गावात एका म्हशीच्या मालकी हक्कावरून अनोखा वाद समोर आला आहे. म्हशीचा वाद इतका गंभीर आहे की हे प्रकरण मोका पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. दोन्ही पक्षांनी म्हशीचा मालकी हक्क अर्थात तिच्या आईचा ठावठिकाणा निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणीची मागणी केली आहे.