Diwali Memes: ‘उठो अनारकली सफाई करनी है’; दिवाळीच्या सफाईवर भन्नाट मीम्स व्हायरल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Memes:

Diwali Memes: ‘उठो अनारकली सफाई करनी है’; दिवाळीच्या सफाईवर भन्नाट मीम्स व्हायरल!

Diwali Memes : दिवाळी हा आनंदाचा सण आहे. भारतातील लोकांमध्ये असलेला उत्साह परदेशातही पहायला मिळतो. दिवाळीची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. दिवाळीत माता लक्ष्मीचे घरी आगमन होते. त्यामुळे लोक स्वच्छता, साफसफाई करण्यात व्यस्त आहेत.

केवळ घरच नव्हे तर ऑफिस, दुकान या ठिकाणी स्वच्छता केली जाते. दिवाळीत माता लक्ष्मीचे घरी आगमन होते. घरची सफाई करताना भावंड एकत्र येतात. एकमेकांना भिजवतात. कोणी पाय घसरून पडलं तर सगळे हसायला लागतात. त्यामुळे काम करताना येणारा थकवा निघून जातो.

घरातील आई बाबांच्या धाकामुळे तूम्हीही कधी ना कधी स्वच्छता केलीच असेल. किंवा यावेळी करत असाल. तूमच्या या स्वच्छतेवर लोक वेगवेगळे मीम्स बनवत आहेत. त्यामुळे दिवाळीची स्वच्छताही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

ट्विटरवर ‘Diwali ki safai’ हा ट्रेंड सुरू आहे. सोशल मीडियावर सफाई करताना जेठालाल गडा, अनारकली, यावर धमाल मीम्स बनवण्यात आले आहेत. फोटो आणि व्हिडीओमधील हे मीम्स पाहुन तूम्हालाही हसू आवरणार नाहीत. तूम्हालाही आज घरच्यांनी सफाई कामात मदत करायला सांगितले असेल तर सफाई करता करता हे मीम्स एकदा बघाच.

टॅग्स :Diwali FestivalDiwali