Viral Video : 'याला ऑस्कर द्या'; कुत्र्याची बॉलिवूड कलाकारापेक्षा भारी Acting

Video
VideoSakal

आपण लहानपणी गोष्ट वाचली असेल की जंगलात गेलेल्या मुलामागे सिंह लागल्यावर तो मेल्यासारखा पडला होता. त्यानंतर सिंह त्याचा वास घेऊन पुढे निघून गेला आणि त्याची सुटका झाली. ही गोष्ट आपल्याला माहिती असेल पण काही प्राणीसुद्धा माणसांना किंवा इतर प्राण्यांना फसवण्यात माहीर असतात. एका कुत्र्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

(Dog acting as dies viral video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा मरून पडल्याची अॅक्टिंग करताना दिसत आहे. तर त्याला अजून एक कुत्रा हलवण्याचा प्रयत्न करतोय. पण तो कुत्रा कसलाच हालचाल करत नसल्यामुळे आपल्यालाही हा मृत कुत्रा असल्याचा भास होईल पण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला सत्य समजेल.

Video
Viral Video : कैसा चोर बनेगा रे तू? पठ्ठ्या मोबाईल घेऊन पळाला पण...

दरम्यान, तिथे उभा असलेल्या मुलाने कुत्र्याचे पाय धरून ओढल्यानंतर तो कुत्रा उठून पळून गेलेला आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. या कुत्र्याने बॉलिवूड कलाकारांपेक्षाही चांगली अॅक्टिंग केली आहे असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर या कुत्र्याची कलाकारी पाहून त्याला ऑस्कर पुरस्कार द्या अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com