Video : आहाहा...! घसरगुंडीची मजा फक्त या कुत्र्यालाच घेता आली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video : आहाहा...! घसरगुंडीची मजा फक्त या कुत्र्यालाच घेता आली

मनुष्याप्रमाणे इतर प्राणीदेखील आनंद शोधत असतात. ज्या त्या प्राण्यांच्या वैशिष्ट्यांनुसार ते गंमतीजमती करत असतात. यामध्ये वानर, माकड, कुत्रे आणि अन्य प्राण्यांच्या गंमतीजमतीचे व्हिडिओ बघितले आहेत. अनेकदा या प्राण्यांचे भावनिक आणि बुद्धिकौशल्याचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा चक्क लहान मुलांप्रमाणे बर्फामध्ये जणू घसरगुंडीच खेळतोय असा खेळताना दिसत आहे. तर एक व्यक्ती त्याचा व्हिडिओ शूट करत आहे. या व्हिडिओला अनेकांनी पसंती दिली असून जगण्याचा आनंद असा मनमुराद घ्यायचा असतो असा उपदेशही नेटकरी करत आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

टॅग्स :Dogviral video