

Priest Patricio Sanchez Dies After Cross Falls During Mass
esakal
Church Viral Video: चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना भलामोठा लाकडी क्रूस थेट अंगावर कोसळल्याने एका धर्मगुरूंचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. इक्वाडोरमधील ग्वायाकिल शहराच्या दक्षिण भागात ही घटना घडली. फादर पॅट्रिसिओ सांचेझ असे मृत धर्मगुरूंचे नाव आहे. ते चर्चमध्ये प्रार्थना सभाघेत असताना अचानक क्रूस कोसळला आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे चर्चमध्ये उपस्थित असलेल्या भाविकांना मोठा धक्का बसला असून, स्थानिक कॅथोलिक समुदायात शोक व्यक्त केला जात आहे.