Viral Video : मस्ती नडतेच! पर्यटकांच्या गाडीवर हत्तीने केला हल्ला; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakalNews

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये स्टंट, डान्स, अपघात, सीसीटीव्ही फुटेज, लग्नाच्या व्हिडिओचा सामावेश असतो. पण सध्या जंगलात फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या गाडीवर हत्तीने हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Viral Video
Crime News : "तू कोणासोबत बोलत होतीस" अशी विचारणा करत जीमहून परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हेल्मेट घालून जंगलातील रस्त्याने पुढे गेलेला दिसत आहे. तर काही वेळाने चिडलेला हत्ती त्याच्यावर हल्ला करतो. तेवढ्यात सदर व्यक्ती पर्यटकांच्या गाडीकडे धावतो. पण हत्ती त्याच्यापाठीमागे धावतो. त्यानंतर हत्ती गाडीवरही हल्ला करताना दिसत आहे.

दरम्यान, हत्तीने गाडीवर हल्ला केल्यानंतर गाडीतील पर्यटकांच्या आरडाओरड्याचा आवाज ऐकायला येत आहे. हत्ती जवळ आला की गाडी चालक गाडी पुढे घेतो आणि गाडीवरील होणारा हल्ला टळतो. पण हत्तीच्या जवळ जाण्याची मस्ती पर्यटकाला नडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओला ट्वीटरवरून शेअर करण्यात आलं असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पण आपणही भविष्यात जंगलात फिरायला गेलात तर काळजी घेणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com