
Sadhvi Harsha Ricchariya News : प्रयागराजमध्ये यंदा महाकुंभ मेळा भरला आहे. यासाठी देश-विदेशातून लाखो भाविकांनी या मेळ्याला हजेरी लावली आहे. यामध्ये जशी विविध प्रकारच्या साधू, बाबांची चर्चा सुरु आहे. तशीच सर्वात सुंदर साध्वी म्हणून चर्चत आलेली हर्षा रिछारिया या मॉडेलनं सध्या माध्यमांमधून बरीच चर्चेत आली.
पण आता तीला कुंभ मेळ्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. अनिच्छेनं आपल्याला कुंभमेळा सोडावा लागत असल्याची खंत तीनं व्यक्त केली आहे. अक्षरशः रडून तीनं आपलं दुःख माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे. तसंच तिच्यावर कुंभमेळ्या दरम्यान काही बाबा आणि खुद्द शंकराचार्यांकडूनही आरोप झाले, या आरोपांना तीनं उत्तरं दिली आहेत.