

Flipkart Event Viral Video Influencers Fight
ESakal
दिल्लीतील भारत मंडपम येथे १९ जून रोजी आयोजित फ्लिपकार्टच्या 'ग्लॅम अप' इव्हेंटमधील एक व्हिडिओ इंस्टाग्राम, रेडिट आणि ट्विटरवर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्स मोफत भेटवस्तू मिळवण्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की करताना आणि वाद घालताना दिसत आहेत. या व्हिडिओवर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असून, लोक त्यावर तीव्र टीका करत आहेत.